असलदे ग्रा. पं. चे उपक्रम कौतुकास्पद

असलदे ग्रा. पं. चे उपक्रम कौतुकास्पद

*कोकण Express*

*असलदे ग्रा. पं. चे उपक्रम कौतुकास्पद*

*कणकवलीचे सभापती मनोज रावराणे*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

असलदे ग्रां.प.ने येथील महीलांना सक्षम करण्यासाठी १४ वा वित्त आयोग कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत शिवणकला तर युवकांना इलेक्ट्रिकल टेक्निशियन सारखा महत्वाचे प्रशिक्षण व तेही पूर्ण एक महिना कालावधी करीता घेत असल्याने खरोरच कौ​तु​​​कास्पद आहे . प्रशिक्षणाचा निधी निव्वळ दोन ते तिन दिवसाचे प्रशिक्षण न देता एक महीना कालावधीचे प्रशिक्षण देण्यासाठी हा निधी खर्च होत असल्याने यातून महीलांना सक्षम बनविण्यासाठी अशा प्रशिक्षणांची सांगड महत्वाची असल्याचे प्रतिपादन कणकवलीचे सभापती मनोज रावराणे यांनी केले. कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोग कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत कौशल्या विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार सलग्न जनशिक्षण संस्थान सिंधुदूर्ग व किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्य संयुक्त विदयमाने इलेक्ट्रिकल टेक्निशियन व शिवणकला प्रशिक्षण तसेच महिलांसाठी हळदिकुंकू समारंभाचे उद्घाटन सभापती रावराणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी रावराणे बोलत होते . यावेळी नांदगाव पं.स.सदस्या हर्षदा वाळके, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, सो.सा.चेअरमन प्रकाश परब , तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे , तळेरे उपसरपंच नांदोस्कर , माजी सरपंच संध्या परब , वंदना हडकर , ग्रा.पं.सदस्या संचिता नरे , प्रतिभा खरात , निलिमा तांबे , मोरजकर ट्रस्ट अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर , तंटामुक्त सचिव रघनाथ लोके.ग्रामसेवक आर.डी.सावंत, सौ.वृषाली मोरजकर , इलेक्ट्रिकल टेक्निशियन प्रशिक्षक शशिकांत मेस्त्री आदी महीला व युवक उपस्थीत होते.शिवणकलेसाठी ५० महीला व इलेक्ट्रिकल टेक्निशियन या युवकांसाठी ​३० जणांची नोंद झाली असल्याने या दोन्ही प्रशिक्षणासाठी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे . यावेळी सभापती रावराणे बोलताना पुढे म्हणाले की , नुसते प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही थांबू नका यातून व्यवसाय निर्माण करून सक्षम बना यासाठी आत्मनिर्भर भारत मार्फतअ शासनांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आम्ही पं.स.मध्ये कक्ष तयार करणार असून येथे सर्व कर्ज योजनांची माहीती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे शेवटी सभापती यांनी सांगीतले . यावेळी पं.स.सदस्या हर्षदा वाळके बोलताना म्हणाल्या की महीलांनी आता चूल आणि मुल न राहता आता पुरे झाल घरात बसून आता हक्कासाठी कंबर कसून याप्रमाणे तुम्हाला सक्षम बनण्यासाठी असलदे ग्रा.पं.सरपंच वायंगणकर व सर्व त्यांच्या टिम ने चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.तेव्हा या संधीच सोन करून आर्थीक सक्षम बनण्याचे आवाहन करत युवांसाठी सुध्दा प्रथमच इलेक्ट्रिकल टेक्निशियन सारखा अत्यंत चांगले प्रशिक्षण ग्रा.पं.निवडले असल्याचे शेवटी सांगीतले .सभापती मनोज रावराणे.पं.स.सदस्या हर्षदा वाळके यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ , प्रतिमा देवून सरपंच पंढरी वायंगणकर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक आर.डी.सावंत , सुत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर तर सर्वांचे आभार सरपंच पंढरी वांगणकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!