भोसले स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सहोदया कोल्हापूर यांच्यातर्फे सत्कार..

भोसले स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सहोदया कोल्हापूर यांच्यातर्फे सत्कार..

*कोंकण Express*

*भोसले स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सहोदया कोल्हापूर यांच्यातर्फे सत्कार..*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मधील शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील इयत्ता दहावीतील प्रथम स्थान प्राप्त केलेला कु.आर्यन हिर्लेकर तसेच शाळेचे गणित शिक्षक संदीप पेडणेकर यांचा सत्कार सहोदया कॉम्प्लेक्स, कोल्हापूर या संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला._
_सहोदया कॉम्प्लेक्स ही सीबीएसई बोर्ड संलग्न संपूर्ण भारतभर पसरलेली संस्था असून देशभरात विभागवार तिच्या शाखा आहेत. दर शैक्षणिक वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थी तसेच शिक्षकांचा सन्मान सहोदया मार्फत करण्यात येतो. कार्यक्रमाला सहोदया कोल्हापूर विभागाच्या अध्यक्षा सस्मिता मोहंती, उपाध्यक्षा जयश्री जाधव तसेच सचिव पूजा चोप्रा उपस्थित होत्या._

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!