*कोंकण Express*
*भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी नवलराज काळे यांनी सहकुटुंब बजावला पदवीधरमतदानाचा हक्क*
*भाजपचे ॲड निरंजन डावखरे बहुमताने निवडून येतील व्यक्त केला विश्वास*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपकडून ॲड निरंजन डावखरे उभे आहेत ते बहुमताने निवडून येतील असा विश्वास भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी नवलराज काळे यांनी व्यक्त केला आहे. श्री काळे यांनी आपल्या कुटुंबासहित वैभववाडी तहसील कार्यालय येथे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी मध्ये आज 26 जून 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वडील विजयसिंह काळे, बंधू ॲड.विक्रमसिंह काळे, व सौभाग्यवती सौ विशाखा काळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.