*कोंकण Express*
*विद्यामंदिर परिसर वाढदिवसानिमित्त वृक्षराजीने बहरला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो . वाढदिवसानिमित्त बरेच विद्यार्थी चॉकलेट व केकचे वाटप करत असत त्यातून शरिरावर विपरित परिणाम घडून येत असतात आपल्या दातांची चॉकलेट मुळे हानी होते या विषयी विद्यार्थी वर्गात मोठ्या प्रमाणात जागृती करून मार्गदर्शन करण्यात आले चॉकलेट व निरोपयोगी भेट वस्तू यांच्यावर खर्च होणार पैसा वाचवून विद्यार्थी हित जोपासणारे उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने प्रशालेत राबवून विद्यार्थ्यांना समूहभावना व समाजहित जोपासण्याची शिकवण दिली जाते याच माध्यमातून प्रशालेच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली . ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस आहे ते सर्व विद्यार्थी शाळेला एक झाड भेट देवून वृक्ष लागवडीच्या मोहिमेला पाठबळ देत आहे कुमार अनिकेत करंबेळकर याने पाच झाडे शाळेला भेट देवून वाढदिवस साजरा केला . कुमारी : वैभवी बाईत हिने वाढदिसाला गरीब विद्यार्थीसाठी आर्थिक मदत केली . कुमारी मैत्रेयी हिर्लेकर हिने महाराष्ट्राचे प्रसिद्ध झाड ताम्हण / जारूळ वृक्षांची भेट दिली यामुळे प्रशालेत वृक्ष लागवडीचा संदेश झपाट्याने पसरला आणि विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड करण्याचीआवड निर्माण झाली . या उपक्रमामध्ये सर्व वर्गशिक्षक तसेच हरितसेना / पर्यावरण विभाग याचा सक्रीय सहभाग आहे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांनी या उपक्रमाचे स्वागत करून वृक्ष लागवड व पर्यावरण या विषयी मार्गदर्शन केले पर्यवेक्षक सौ जाधव मॅडम जेष्ठ शिक्षक श्री अच्युतराव वणवे सर
यांनी या उपक्रमाचे कौतुक केले . शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री तवटे साहेब चेअरमन डॉ साळुंखे मॅडम सचिव श्री वळंजू साहेब या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या .