*कोंकण Express*
*उबाठा ला जनतेने नाकारले, आपले अपयश झाकण्यासाठी निवडणूक आयोगाविरुद्ध ठोठो..*
*भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका*
*21 जागा लढवून उबाठाने फक्त 9 जागा जिंकल्या हा स्ट्राइक रेट अपयशी*
*मात्र संजय राऊत चा महिलांना शिव्या देण्याचा स्ट्राईक रेट जास्त*
*संजय राऊत हा सर्वात चीटर विध्यार्थी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज सकाळी निवडणूक आयोगावर खडी फोडण्याचे काम राऊत ने नेहमी प्रमाणे केले.
यातून महाविकास आघाडीचे सोयीचे राजकारण सुरु आहे हे दिसले. 2014 व 2019 मध्ये मोदी साहेबांसोबत एकत्र होते तेव्हा निवडणूक आयोगवार आक्षेप वाटला नाही. यावेळी महाविकास आघाडी सोबत जाऊन 21 जागा लढवून फक्त 9 जागा उबाठा ला मिळविता आल्या. हा यांचा स्ट्रीक रेट.त्यामुळे आपले अपयश निवडणूक आयोगाच्या माती मारण्याचा प्रकार आहे. तुमचे नऊ आमदार जिथे निवडून आले तिथे ईव्हीएम योग्य आणि इतर ठिकाणी ठिकाणीच निवडणूक आयोगावर तुमची तक्रार कशी. त्या नऊ जागांवर ही चौकशीची मागणी करा. उबाठा च्या या घाणेरड्या मानसिकतेला महाराष्ट्रात थारा मिळता कामा नये असेही आमदार नितेश राणे म्हणाले.
संजय राऊत हा सर्वात चीटर विध्यार्थी आहे. नाशिक मधील शिक्षकांजवळ मत मागत आहे. त्यांना उपदेश देत आहे. पुन्हा बॅगा तपासल्या तेव्हा काही सापडले नाही.खोटे आरोप राऊत ने करू नये नाहीतर तुझ्या बॅगा आम्ही तपासू असा इशारा दिला.
संजय राऊत ने मागच्या दराने खासदार न होता. लोकांमधून निवडनुक लढविण्याची हिम्मत करावी मग निवडणूक का असते हे त्याला कळे.केंद्राच्या नेतृत्वाने वस्तुस्थिती मांडली टार्गेट केले नाही.संजय राऊत चा महिलांना शिव्या देण्याचा स्ट्राईक रेट जास्त आहे.अशी टीका एका प्रश्नांवर बोलताना दिली.
निवडणूक आयोग कारवाई सरकार वडापाव चे दुकान नाही संजय राऊत व बाजूच्या लोकांवर लवकरच कारवाई होईल.
उद्धव ठाकरे नी निवडणुकीत पत्रकार परिषद घेऊन भ्रम पसरवले. अहवाल मागवले असतील तर ते योग्य आहे. त्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे.
जारांगेनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे ठरविलेलं असेल तर कडवट मराठा म्हणून निवडणूक लढवावी. आता माघार घेऊ नये असे आमदार नितेश राणे म्हणाले.कोणत्याही धर्माच्या नावाने आरक्षण मिळत नाही जातीच्या नावाने आरक्षण मिळत हे जरांगे ना माहित नसावं.
नीट चे धागेदोरे कलानगर मध्ये पोचू शकतात. बिहार आणि मातोश्री यांचं नातं बाहेर पडेल.असा टोला त्यांनी लावला.
कोणत्याही आरोपावर चौकशी झाली पाहिजे आम्हाला पैसे वाटायची गरज नाही.मात्र घरातील फर्निचर साठी पैसे मागणाऱ्या अंधारे ताईंनी आरोप करण्यापूर्वी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. तुमचा मालक स्वतःच्या पायावर उभा आहे का ? 288 मतदार संघ लढवून दाखवावे दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊ नये असे आव्हान उभाटाला आमदार नितेश राणे यांनी केले.