*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० कर्णबधिर व्यक्तीं व मुलाना मोफत श्रवण यंत्रांचे वाटप…*
*सिंधुदुर्गनगरी दि.०२:-*
जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग, महात्मा गांधी सेवा संघ औरंगाबाद, तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० कर्णबधिर व्यक्तीं व मुलाना मोफत श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग, महात्मा गांधी सेवा संघ औरंगाबाद तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्णबधिर व्यक्तींना मोफत श्रवण यंत्राचे वाटपाचा कार्यक्रम जिल्हा समाज कल्याण अधिकारी मदन भिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग दिव्यांग कक्ष येथे संपन्न झाला .सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील गरजू ४० कर्णबधिर व्यक्तीं व मुलाना मोफत श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले .यावेळी महात्मा गांधी सेवा संघाचे सतीश निर्मळ, सामाजिक कार्यकर्ते संजय शिर्के, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र समन्वयक कु. रूपाली वरक आदी यावेळी उपस्थित होते.