*कोंकण Express*
*’एक सेल्फी वृक्ष संवर्धनासाठी!’*
*|| वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ||*
*(गोपुरी आश्रमाच्या वतीने युवकांना आणि नागरिकांना आवाहन)*
वृक्ष हा निसर्गातील सर्वांत महत्त्वाचा घटक. सजीवसृष्टीला ऑक्सिजन पुरविण्याचं महत्त्वाचं काम ही झाडं करतात. मात्र हल्ली चाललेली याच निसर्गठेव्याची नासधूस संपूर्ण सजीवसृष्टीलाच घातक ठरू पाहत आहे. कारण निसर्ग वाचला तरच आपण वाचू. याच उद्देशाने गोपुरी आश्रम, वागदे यांमार्फत एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पावसाळ्यात वड किंवा पिंपळ याची लागवड करून त्याचा सेल्फी आम्हाला पाठवायचा आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच झाडासोबतचा सेल्फी आम्हाला पाठवायचा आहे.
हा उपक्रम पूर्ण करणाऱ्या सर्वांना गोपुरी आश्रमा मार्फत पुढच्या वर्षी जुन महिना अखेरीस एक सन्मानचिन्ह आणि झाड भेट म्हणून देऊन खास मान्यवरांच्या उपस्तितीत सन्मान करणार आहोत.
चला तर निसर्ग संवर्धनाच्या या कार्यात आपलाही एक मोलाचा वाटा उचलूया. इच्छुकांनी 9420261196 या नंबरवर आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि सेल्फी फोटो पाठवा. अधिक माहितीसाठी 9423331419 या नंबरवर संपर्क साधा. हा सेल्फी फोटो पाठवायची अंतिम मुदत : 15 ऑगस्ट, 2024 आहे. तरी जास्तीत जास्त युवक व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन गोपुरी आश्रम आणि मित्र परिवारच्या वतीने करण्यात आले आहे.
|| निसर्ग नको, स्वतःला वाचवूया || ☝

