*कोंकण Express*
*ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेशचां कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ॲड.निरंजन डावखरे यांना पाठिंबा*
*कोकणचे भाग्यविधाता विद्यमान खासदार नारायण राणे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणाली वरती विश्वास ठेवत कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी पाठिंबा केला जाहीर*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश युवक आघाडीच्या वतीने कोकणचे भाग्यविधाता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण महाराष्ट्राचे युवा नेता आमदार नितेश राणे यांच्या कार्यप्रणाली वरती विश्वास ठेवत कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ॲड.निरंजन डावखरे यांना कोकण प्रदेशाध्यक्ष युवक आघाडी श्री नवलराज काळे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. पाठिंबामध्ये कोकण विभागातील सर्व धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांना पदवीपर्यंत शिक्षण घेण्याकरिता योग्य उपायोजना होतील अशा प्रकारचे नियोजन विजय झाल्यानंतर उमेदवार निरंजन डावखरे यांनी करावे व दरीखोरीत राहणाऱ्या धनगर समाजाला योग्य न्याय द्यावा अशी मागणी काळे यांनी केली आहे. आमदार नितेश राणे हे कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा आढावा घेण्याकरिता वैभववाडी दौऱ्यावर होते यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे युवा कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष यांच्या अनुमतीने ॲड. निरंजन डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला यावेळी बोलत असताना काळे यांनी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब , आमदार नितेश राणे साहेब यांसारखे अनेक नेते कोकणच्या विकासासाठी झटत आहेत. या नेतृत्वांचे धनगर समाजाकडे योग्य पद्धतीने लक्ष आहे ते वारंवार त्यांच्या कृतीतून महाराष्ट्राला दिसून आले आहे. धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या नेतृत्वाने कोकणामध्ये खूप काही केले आहे. आणि त्याचा मी एक साक्षीदार आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निवडून आणणे आमचं कर्तव्य आहे आणि त्याकरिता आम्ही सर्वांनी एकमताने हा पाठिंबा जाहीर केला आहे असे मत व्यक्त केले. सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या पाचही जिल्ह्यातून धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदार आहेत.
या मतदारांच्या जोरावर ऍड.निरंजन डावखरे यांच्या मताधिक्यात खरेचा वाटा देण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत. यावेळी आमदार नितेश राणे, पदवीधर मतदार संघ सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी प्रमोद रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, भालचंद्र साठे प्राची तावडे,सांगळवाडी कृषी कॉलेजचे संस्थापक संदीप पाटील, प्रकाश पाटील, वैभव रावराणे,ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे माजी पदाधिकारी अंबाजी हुंबे, सूर्यकांत बोडके, रोहनराव राणे संताजी रावराणे व इतर प्रतिनिधी मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*बॅलेट पेपर वरील क्रमांक एक वर [ | ] 👈अशी उभी एक रेष मारून ॲड. निरंजन डावखरे यांना प्रचंड बहुमताने विजय करावा असा आवाहन कोकण प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश च्या वतीने करण्यात आले आहे.*