रमेश कीर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार

रमेश कीर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार

*कोंकण Express*

*रमेश कीर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार*

*आ. वैभव नाईक, उमेदवार रमेश किर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न*

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ आज कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी रमेश किर यांना मोठया मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद कुडाळ येथील हॉटेल कोकोनट येथे पार पडली.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर, आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, संदेश पारकर, संजय पडते,इर्शाद शेख, अमित सामंत, अर्चना घारे,प्रसाद रेगे,विवेक ताम्हाणेकर,अभय शिरसाट, राजन नाईक, संतोष शिरसाट, मंदार शिरसाट, अमरसेन सावंत, किरण शिंदे, उदय मांजरेकर, अनंत पिळणकर,सचिन काळप अमित राणे, गुरु गडकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!