*कोकण Express*
*बाजारपेठेत पे पार्किंगचा निर्णय भाजी मार्केट मधील व्यावसायिकांचा प्रश्न सुटणार..*
*कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजी मार्केट येथील दुकानदार यांनी आपल्या समस्या घेऊन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे गेले होते. कणकवली भाजी मार्केट मध्ये सध्या ५० च्या वर दुकानदार आपल्या पोटा पाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत आहेत. त्यात मार्केट मध्ये मंदी आहे, यातच रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांची टु व्हीलर पार्किंगसाठी खुप मोठी दमछाक होत आहे. हाच प्रश्न घेऊन भाजी मार्केट मधील सर्व दुकानदार कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना भेटले आणि आपले मत मांडले असता, नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी टु व्हिलर पार्किंग, फोर व्हिलर गाड्यांसाठी एक जागा नेमुन देणार आहेत. त्या त्या जागेत पैसे देऊन गाड्या पार्क करण्यात येतील. यातील निम्मे रक्कम नगरपंचायत व निम्मे रक्कम रस्ते बांधकाम विभाग यांच्या कडे देण्यात येणार आहे.
कणकवली भाजी मार्केट येथे मार्च २०२० नंतर लॉकडाऊन झाला, या काळात आता पर्यंत कचरा गोळा करणारी गाडी भाजी मार्केट मध्ये आली नाही. ही तक्रार देखील भाजी मार्केट मधील दुकानदार यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे केली. त्यांनी आज पासुन कचरा गोळा करणारी गाडी येऊन सर्व दुकानासमोर असलेला कचरा गोळा करेल. असे श्री. समीर नलावडे यांनी सांगितले.