फोंडाघाट महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. संतोष रायबोले यांची निवड!

फोंडाघाट महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. संतोष रायबोले यांची निवड!

*कोंकण Express*

*फोंडाघाट महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. संतोष रायबोले यांची निवड!*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. संतोष रायबोले यांची नियुक्ती करण्यात आली.

डॉ. संतोष रायबोले हे महाविद्यालयात २००६ सालापासून हिंदी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते दोन वेळा नेट परीक्षा उत्तीर्ण झाले असून, एम.ए., बी.एड., एम.फिल., पी.एच.डी. अशी शैक्षणिक अहर्ता प्राप्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी पाचपेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले असून काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांनी १०० पेक्षा अधिक संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व विद्यापीठ स्तरावरील विविध कार्यशाळा, चर्चासत्रात वाचन केले आहे, तसेच अनेक ठिकाणी विषयतज्ञ व अध्यक्षता केली आहे. त्यांचे विविध विषयावरील सुमारे ५० पेक्षा अधिक संशोधन निबंध प्रकाशित केलेले आहेत.

आपल्या नियुक्तीच्या संदेशात डॉ. संतोष रायबोले म्हणाले की, आपण सर्वांनी मिळून काम करूया. आपल्याला नजीकच्या काळात नॅकला समोरे जायचे आहे. त्यामुळे सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करूया व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवूया.

त्यांना प्रभार प्रदान करण्यासाठी संस्थेचे सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस व संचालक रंजन नेरूरकर उपस्थित होते. सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ. संतोष रायबोले यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!