फलोद्यानाचे प्रणेते शिक्षण महर्षी केशवराववजी राणे साहेब

फलोद्यानाचे प्रणेते शिक्षण महर्षी केशवराववजी राणे साहेब

*कोंकण Express*

*फलोद्यानाचे प्रणेते शिक्षण महर्षी केशवराववजी राणे साहेब*

निसर्गरम्य कोकण वृक्षराजीने नटलेले या नयमरम्य सौंदर्यात कोकणी माणूस गुरफटून गेलेला . या गुरफटलेल्या जाळ्यात कोकणला बाहेर काढण्यासाठी अनेक समाजसेवक पुढे सरसावले पण शिक्षणाचा अभाव सर्वत्रच जाणवत होता कोकण सर्वार्थाने विकसित व्हायचे असेल तर प्रथम कोकण भूमित ज्ञानगंगेचा प्रवाह वाहता ठेवला पाहिजे म्हणून केशवरावजी राणे साहेब निष्णांत कायदे पंडित असूनही कोकणचा कायापालट करण्याचे शिवधनुष्य उचलले आणि ज्ञानगंगा कोकणच्या घराघरात निर्माण केली . १९५९ साली शिक्षण प्रसारक मंडळ ची स्थापना झाली अनेक मंडळी ज्यांनी शिक्षणावर प्रेम केले समाज उद्धाराची स्वप्न बाळगलेले कार्यकर्ते राणेसाहेबांच्या मदतीला धावून आले आणि विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला व कणकवली कॉलेज ही ज्ञानाची पवित्र मंदिरे उभी केली अनेक रयतेची मुले ”’सामान्य कष्टकऱ्यांची मुले ‘ दीन दलितांची मुले शिक्षणातून धडपडत यशाच्या शिखरापर्यंत पोहचली . या ज्ञानमंदिराचा कळस आज गगनाला भिडला आहे राणेसाहेब हे ज्ञानमंदिर पाहून कृतार्थ झाले . केशवराव राणेसाहेब हे निःपृह वृत्तीचे कायदे पंडित होते . अनेक विषयांचे अभ्यासक होते कोकणचा शेतकरी हा साहेबांचा जिव्हाळ्याचा विषय होता म्हणून साहेब शेतकऱ्यांच्या विकासासाठी सतत झटत राहिले . कोकणात फलोद्यातून सामान्य शेतकऱ्यांचा विकास होवू शकतो हे साहेबांनी कुशाग्र बुद्धीमतेने हेरले आणि कोकणच्या गावागावात फळांच्या लागवडीची राणे साहेबांनी मोठ्या प्रमाणात जागृती करून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत केली फलोद्याना बरोबरच जोडव्यवसाय म्हणून मसाला पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले अनेकांचे संसार या उद्योगामुळे सुरळीत झाले बघता बघता हरित क्रांतीचे वारे कोकण भूमित पाण्यावर तेलांचा तवंग पसरावा तसा पसरत गेला . अज्ञान अशिक्षित माणसांना केशवराव राणे साहेबांनी उन्नतीच्या पैलतिरावर नेवून ठेवले कोकणचा विकास जर करायचा असेल तर कोकणी माणसाच्या हाताला उद्योग पाहिजे म्हणून राणे साहेबांनी आपल्या राजकीय पदांचा उपयोग केवळ समाजाच्या विकासासाठीच केला . वैयक्तीक उद्धारासाठी साहेबांनी सत्तेचा आणि पदांचा दुरुपयोग कधिच केला नाही केशवराव राणे साहेब हे नेहमी लोकोद्धारासाठीच झगडले आणि जनतेच्या मनांत कृतार्थ भावनांचे पाझर निर्माण करून गेले आज त्यांच्या कर्तव्य भावनांना यशाची पालवी फुललेली आहे राणे साहेबांसारखे क्वचित माणसे जन्माला येतात आणि सामान्य माणसांच्या मनात कायमची स्मृती ठेवून जातात . आदरणीय केशवराव राणे साहेबांच्या चौदाव्या स्मृती दिनानिमित शतश: प्रणाम .
.
डॉ पी जे कांबळे
मुख्याध्यापक
विद्यामंदिर कणकवली
सिंधुदुर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!