*कोकण Express*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलमध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम संपन्न*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- बुधवार, दिनांक-१९ जून २०२४ रोजी प्रशालेत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वह्यांचे वितरण करण्यात आले.*
*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना आर्थिक मदत या उद्देशाने शालेय समिती व माजी विद्यार्थी यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्यांचे वाटप करण्यात आले, सामाजिक जीवन जगत असताना आपण समाजाचे देणे लागतो. या उदात्त हेतूने माजी विद्यार्थी व शालेय समिती सदस्य यांच्या संयुक्त प्रयत्नाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भिरवंडे गावचे सुपुत्र, कार्यक्रमाचे सर्वेसर्वा शालेय समिती सदस्य बावतीस घोन्सालवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.*
*दानशूर व्यक्तींच्या उदात्त भावनेतून “एक हात मदतीचा ” व अमूल्य देणगीच्या स्वरूपातून विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण संस्थेचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.*
**सदर कार्यक्रमांसाठी दानशूर दात्यांनी आर्थिक निधी प्रशालेला उपलब्ध करुण दिला.*
*सन्मा. श्री. सुभाष हरिश्चंद्र सावंत यांच्याकडून कै.हरिश्चंद्र सावंत यांच्या स्मरणार्थ रु ११०००/-*
*सन्मा. श्री.सखाराम बाळकृष्ण सावंत यांच्याकडून श्री.बाळकृष्ण सखाराम सावंत यांच्या स्मरणार्थ रु १००००/-*
*सन्मा. श्री.व्ही.बी. सावंत, संस्था संचालक व निवृत्त प्राध्यापक यांच्याकडून रु १००००/-*
*सन्मा. श्रीमती. विद्या दयाळ सावंत ताई यांच्याकडून कै.दयाळ वासुदेव सावंत यांच्या स्मरणार्थ रु १००००/-*
*सन्मा. श्रीमती आनमारी जॉन डिसोजा, चेअरमन कॅथॉलिक पतसंस्था सावंतवाडी, यांच्याकडून क्रिस्तोफर जॉन डिसोजा, शिक्षक मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी यांच्या स्मरणार्थ रु ५०००/-*
*सन्मा. श्री. जॉन पिटर डॉन्टस, संचालक कॅथॉलिक पतसंस्था सावंतवाडी, यांच्याकडून क्रिस्तोफर पिटर फ्रान्सिस डॉन्टस, माजी सैनिक, संस्थापक कॅथॉलिक पतसंस्था यांच्या स्मरणार्थ रु ५०००/-*
*सन्मा. श्री. रुपेश सावंत, सावंत मेडिकल स्टोअर्स कनेडी बाजारपेठ यांच्याकडून रु ३०००/-*
*सन्मा. श्री.गणपत सावंत गुरुजी, शालेय समिती खजिनदार यांच्याकडून रु २०००/- या सर्व दानशूर व्यक्तींच्या आर्थिक निधीतून वह्या संकलित करण्यात आल्या.*
*या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत (अध्यक्ष, क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबई), प्रमुख पाहुणे सन्मा. श्री. जॉन पिटर डॅन्टस (संचालक- कॅथॉलिक पतसंस्था सावंतवाडी),सन्मा. श्री. जॉनी पास्कोल फेराव,( संचालक- कॅथॉलिक पतसंस्था सावंतवाडी), सन्मा. श्री. जेम्स बॉर्जीस( जनरल मॅनेजर कॅथॉलिक पतसंस्था सावंतवाडी), शालेय समिती चेअरमन सन्मा.श्री. आर.एच. सावंत, शालेय समिती खजिनदार सन्मा. श्री. गणपत सावंत गुरुजी,सर्व शालेय समिती सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक मा.श्री. बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यी उपस्थित होते*.
*कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मा.श्री. प्रसाद मसुरकर (सहा. शिक्षक) यांनी केले*.