देवगड तालुका पत्रकार समितीचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

देवगड तालुका पत्रकार समितीचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

*कोकण Express*

*देवगड तालुका पत्रकार समितीचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर*

*देवगड तालुका पत्रकार समितीचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर*

▪️स्वप्नील लोके , महेश तेली, नागेश दुखंडे यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जाहीर*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कारांची घोषणा रविवारी झालेल्या समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
देवगड तालुका पत्रकार समितीचे २०२०-२१ या वर्षातील पुरस्कारांची घोषणा समितीचे अध्यक्ष प्रशांत वाडेकर यांनी केली. यामध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार (शहरी विभाग) सिंधुदुर्ग लाईव्ह देवगड प्रतिनिधी स्वप्नील यशवंत लोके यांना जाहीर झाला. पर्यटन, उद्योजकता आणि सामान्य जनतेचे प्रश्न याला प्राधान्य देत शहरी भागात अतिशय उत्कृष्ट वार्तांकन केल्याबद्दल लोके यांचा या पुरस्काराने सन्मान होत आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार दैनिक तरूण भारत चे नागेश जयवंत दुखंडे (तळेबाजार) व महेश शंकर तेली (गवाणे) यांना जाहीर झाला. यावर्षी प्रथमच विशेष सन्मान पुरस्कार देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाला जाहीर करण्यात आला आहे. उमाबाई बर्वे ग्रंथालयामार्फत गेली १० वर्ष आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. त्याप्रित्यर्थ बर्वे ग्रंथालयाचा सन्मान केला जाणार आहे. हा पुरस्कार सोहळा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी दि. २० फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी अध्यक्ष वाडेकर यांनी दिली.
या सभेस उपाध्यक्ष दयानंद मांगले, सचिव स्वप्नील लोके, खजिनदार दिनेश साटम, सहसचिव नागेश दुखंडे, माजी अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, संतोष कुलकर्णी, राजीव पडवळ, अयोध्या प्रसाद गावकर, सुरज कोयंडे, अनिल राणे, संतोष साळसकर, वैभव केळकर, गणेश आचरेकर, महेश तेली, रत्नदीप कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!