दिल्लीतील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत प्रसन्ना परबचे यश..!

वेंगुर्ला, दि. १९ : दिल्ली येथे झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२० स्पर्धेत सावंतवाडी येथील मदर क्वीन इंग्लिश स्कुलची विद्यार्थिनी, वेंगुर्ले- मातोंड गावची सुकन्या प्रसन्ना प्रदीप परब हिने सब ज्युनिअर ५२ किलो खालील वजनी गटात नॅशनल बेंच प्रेस चॅम्पियनशिप व नॅशनल डेड लिफ्ट चॅम्पियनशीप या दोन गटात भारतात द्वितीय क्रमांक पटकावत दोन सिल्वर मेडल प्राप्त केली आहेत. नवी दिल्ली येथे १४ ते १७ मार्च दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. याआधी कल्याणमध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रसन्ना हिने दोन गटात दोन गोल्ड मेडल पटकावले होते. प्रसन्ना हिला प्रशिक्षक मंगेश घोगळे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!