*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या शैक्षणिक विकासासाठी प्रा . विजय सावंत सरांचा मदतीचा हात*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शैक्षणिक साहित्य तसेच भौतिक साधनांच्या विकासासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती मदतीचा हात पुढे करत आहेत त्यातून प्रशालेतील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत होते अनेक माजी विद्यार्थी सेवाभावी मंडळी विद्यामंदिरच्या प्रगतीसाठी आणि कष्टकरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाच्या शैक्षणिक विकासाठी अनेक छोट्या मोठ्या देणग्या देवून प्रशालेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास प्रयत्नशील आहेत . कणकवली कनिष्ठ महाविद्यालयाचे हिंदीचे प्राध्यापक आदरणीय विजय सावंत सर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासावर सतत प्रेम करणारे आणि गरीब होतकरू मुलांच्या शिक्षणात मदत करून जीवन समृद्ध करणारे आदर्श व्यक्तीमत्व विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील भौतिक सुविधांची अडचण पाहून सावंत सरांनी पाच हजार रुपयांचा सांऊण्ड बॉक्सचा स्टॅण्ड देणगी स्वरूपात भेट दिली त्याबद्दल मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर जेष्ठ शिक्षक वणवे सर श्री सिंगनाथ सर यांनी सावंत सरांचे पुष्प गुच्छ देवून आभार मानले आणि दातृत्वा बद्दल शुभेच्छा दिल्या .