*कोकण Express*
*महिला मोर्चा सावंतवाडी शहर मंडलची कार्यकारिणी जाहीर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
बूथची रचना व बूथ बांधणी या संदर्भातील सावंतवाडी शहर मंडलाची नियोजन बैठक दि. 1/02/2021 रोजी संध्या. 6.00 वा. *मा.महिलाजिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे यांच्या अध्यक्षतेखाली* पार पडली. यावेळी जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर,कुडाळ तालूका चिटणीस रेवती राणे,नगरसेविका दीपाली भालेकर,उत्कर्षा सासोलकर,सम्रूद्धी विरनोडकर यांच्या उपस्थितीत महीला शहर अध्यक्ष मोहीनी मडगावकर यांनी महिला शहर कार्यकारिणी जाहीर केली. महीला सरचिटणीस मेघना साळगावकर, ज्योती पाटणकर,उपाध्यक्ष अँड.सुप्रिया केसरकर,मिसबा शेख, अँड.पुजा जाधव,ज्योती मुद्राळे,चिटणीस निर्मला यादव,श्रद्धा नाईक,अदीती दळवी,निमंत्रित सदस्य परिणीती वर्तक आणि सोशल मिडीया प्रमुख पदी दीप्ती माठेकर यांची तर बुथ अध्यक्ष म्हणून प्राजक्ता मुद्राळे,साक्षी गवस,बेला पिंटो,अस्मिता भराडी यांची नेमणूक करण्यात आली.