*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मार्च २०२४ मध्ये झालेल्या शालांन्त परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. विजयकुमार वळंजू साहेब विश्वस्थ मा . अनिल डेगवेकर साहेब उपस्थित होते . विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळेतून १९२ विद्यार्थी दहावीच्या बोर्ड परिक्षेला प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले प्रशालेचा निकाल ९९ . ४७ % लागला . १७ विद्यार्थी विशेष श्रेणीत पास झाले प्रशालेतून पहिला येणाचा मान कुमारी सबुरी नानचे हिने मिळविला तिला ९६ .८० % गुण प्राप्त झाले गुणवत्ता यादीत कुमारी गोसावी कुमारी मैथिली कदम कुमारी फणसळकर हे विद्यार्थी झळकले या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव आदरणीय वळंजू साहेब व आदरणीय डेगवेकर साहेब यांच्या हस्ते रोख रक्कम व पुष्प गुच्छ देवून करण्यात आला . यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . जेष्ठ शिक्षक श्री वणवे सर यांनी उत्तम निवेदन करत विद्यार्थी पालक व संस्था यांच्या विकासाचा आढावा घेत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली . मा . डेगवेकर साहेब यांनी अभ्यास आणि नियोजन या विषयी मार्गदर्शन केले सचिव श्री वळंजू साहेब यांनी मार्गदर्शनपर भाषणातून चैतन्यदायी प्रेरणा देत विद्यार्थ्याचे आरोग्य आणि शिक्षण सद्यस्थितीत विद्यार्थ्यानी शिक्षणाची वाटचाल कशी करावी याविषयी उद्बोधक मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या . प्रा मुरकर सरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या . याचवेळी इयत्ता दहावीला मार्गदर्शन करणाऱ्या प्रशालेतील सर्व अध्यापकांचा सत्कार आदरणीय सचिव मा वळंजू साहेब यांनी करून प्रशालेच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले यावेळी सर्व विद्यार्थी पालक प्राथमिक विभागातील व इंग्लिश विभागातील अध्यापक कार्यक्रमाला उपस्थित होते . या कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम यांनी मानले .