कासार्डे माध्यमिक विद्यालयात पुष्पवृष्टी करून नवागत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

कासार्डे माध्यमिक विद्यालयात पुष्पवृष्टी करून नवागत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

*कोंकण Express*

*कासार्डे माध्यमिक विद्यालयात पुष्पवृष्टी करून नवागत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

शैक्षणिक वर्ष सन.२०२४-२५ शाळांचा पहिला दिवस नवागतांच्या अनोख्या पद्धतीने केलेल्या स्वागताने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील घंटा वाजली असून विविध शैक्षणिक उपक्रमाने संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक पर्यवेक्षक, शिक्षकवृदांमार्फत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी लहान मुलांच्या चेहर्‍यावर अक्षरशःआनंद ओसंडून वाहत होता.शाळेचा आजचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह,आनंद दिसत होता.
कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्य- विद्यालयात तर नवागत विद्यार्थ्यांचे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत जंगी स्वागत करण्यात आले आहे. याप्रसंगी कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सहसचिव आनंद कासार्डेकर,पदाधिकारी रविंद्र सीताराम पाताडे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,माजी कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर,माजी सैनिक तथा संस्था पदाधिकारी रवींद्र गणपत पाताडे,
मुख्याध्यापिका सौ.बी.बी.बिसुरे,
पर्यवेक्षक एस.व्ही राणे,क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,एन.सी.सी शिक्षक यशवंत परब,कला शिक्षक सागर पांचाळ इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी झेंडुच्या फुलांच्या पाकळ्यांची वृष्टी करीत नवागताचे स्वागत केले तर पाचवीच्या वर्गशिक्षिका सौ.पुजा पाताडे व सौ.पेडणेकर यांनी पंचाआरती ओवाळून विद्यार्थ्यांचे औक्षण केले तर
शाळेच्या व संस्थेच्यावतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचेही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात केले. सुमधुर शालेय गाण्यांनी आणि रंगीबिरंगी फुग्यांच्या कमानीनीने शालेय परिसरात नवचैतन्य निर्माण झालेले दिसून येत होते.
स्वागतपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.बी.बी. बिसुरे यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीची माहिती कथन करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्था पदाधिकारी संजय पाताडे,आनंद कासार्डेकर,
प्रभाकर कुडतरकर,रवींद्र पाताडे आदींनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्येक सहशालेय उपक्रमात सहभाग घेऊन अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवावे असे आवाहन केले व त्यांना नवीन शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तर पालकांच्या वतीने सचिन मेस्त्री यांनी तर विद्यार्थ्यांच्यावतीने कु.अथर्व गुरूप्रसाद सावंत याने अनोख्या पद्धतीने आपले स्वागता केल्याबद्दल विशेष धन्यवाद देत शाळेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.व्ही.राऊळ यांनी केले तर आभार पर्यवेक्षक एस.व्ही. राणे यांनी मानले.दरम्यान याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचेही वितरणही करण्यात आले.नवागत स्वागत सोहळ्याला पालक व प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!