*कोंकण Express*
*मध्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणारी गाडी क्र.०११३९/४० नागपूर ते मडगांव गोवा एक्स्प्रेस कायमस्वरुपी सुरु करण्याची प्रवाशांची मागणी-राष्ट्रीय सरचिटणीस श्री.वैभव बहुतूले*
*दापोली ः प्रतिनिधी*
खान्देश विदर्भातील नागरिकांना कोकण प्रांताकडे जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणारी गाडी क्र.०११३९/४० नागपूर ते मडगांव गोवा एक्स्प्रेस कायमस्वरुपी सुरु करण्याची प्रवाशांची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस श्री.वैभव बहुतूले यांनी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी,केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,केंद्रीय परिवहन तथा नागपूर खासदार नितीन गडकरी,रेल्वे बोर्ड अध्यक्षा,मुख्य व्यवस्थापकीय संचालक रेल्वे बोर्ड,संयुक्त निर्देशक कोचिंग,उप निर्देशक कोचिंग,चंद्रपूर नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे पोस्टल रजिस्टर द्वारे केली आहे*
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी,केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,केंद्रीय परिवहन तथा नागपूर खासदार नितीन गडकरी,रेल्वे बोर्ड अध्यक्षा,मुख्य व्यवस्थापकीय संचालक रेल्वे बोर्ड,संयुक्त निर्देशक कोचिंग,उप निर्देशक कोचिंग,चंद्रपूर नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नागपूर येथील महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची दिक्षाभुमी,वर्धा येथील सेवाग्राम महात्मा गांधीचे आश्रम,अमरावती येथे संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोझरी बरोबरच मूर्तीजापूर येथील दत्त- कार्तिक स्वामी मंदिर,बुलढाणा जिल्ह्य़ातील शेगांव येथील भाविकांचे आराध्य दैवत संत शिरोमणी गजानन महाराज समाधीस्थळ-पाचधाम,सिंधखेडराजा येथील माॅ जिजाऊ जन्मस्थळ आणि नांदुरा येथील जगप्रसिद्ध एकशे पाच फुटी हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन कोकणातील असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने बुलढाणा,अकोला,अमरावती,वर्धा,नागपूर परिसरात येत असतात.विदर्भ,खान्देश परिसरातील नागरिक कोकणातील निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी येत असतात.
नागपूर ते मडगांव दैनिक नियमित गाडी सुरु करण्याची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.नागपूर येथुन मध्य रेल्वेकडून दैनिक चालवणे शक्य नसल्यास गोंदिया जं मडगांव किंवा बल्लारशाह मडगांव रेल्वे प्रशासनाकडुन चालवण्यात आल्यास विदर्भातील प्रसिद्ध नागपूरी संत्री-सोनपापडी-संत्रा बर्फी,अमरावती येथील सीताफळ,शेगांव येथील प्रसिद्ध शेगांव कचोरी,जळगाव येथील केळी,नाशिक द्राक्ष,संगमनेरची डाळींबांचा स्वाद कोकणवासीयांना रेल्वेसेवेमुळे कोकणातच घेता येईल.कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा,आंबा पोळी,आमरस,फणसपोळी,कडकबुंदी लाडू,मालवणी खाजा,काजुगर,सावंतवाडीची लाकडी खेळणी इ. विदर्भातील नागरिकांना उपलब्ध होऊ शकणार आहे.याद्वारे अनेकांना रोजगार उपलब्ध होऊन रेल्वे विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल
*मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर ते मडगांव दैनिक नियमित चालवण्याची मंजुरी दिल्यास खान्देश,विदर्भा भागातील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळू शकेल.याप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्गाला रोजगार उपलब्ध होईल आणि मध्य रेल्वे विभागाला सुद्धा मोठ्या प्रमाणात राजस्व प्राप्त होऊ शकतो.या सर्व बाबींचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर ०११३९/४० नागपूर मडगांव प्रतिक्षा बी विकली एक्स्प्रेस दैनिक नियमित सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस श्री.वैभव बहुतूले यांनी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी,केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,केंद्रीय परिवहन तथा नागपूर खासदार नितीन गडकरी,रेल्वे बोर्ड अध्यक्षा,मुख्य व्यवस्थापकीय संचालक रेल्वे बोर्ड,संयुक्त निर्देशक कोचिंग,उप निर्देशक कोचिंग,चंद्रपूर नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे पोस्टल रजिस्टर पाठवून केली आहे*