*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत विद्यार्थांना पाठ्य पुस्तकांचे वितरण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांचे भव्य दिव्य स्वागत करून नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाला. याचवेळी इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत देण्यात आलेली मोफत पाठ्य पुस्तकांचे वाटप मुख्याध्यापक श्री.पी.जे. कांबळे सर आणि जेष्ठ शिक्षक श्री. वणवे सर यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वितरण केल्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणात अभिरूची वाढण्यास मदत होईल तसेच आनंददायी अध्ययन होईल शाळेची आवड निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळेल. या सर्व कारणांचा विचार करून प्रशालेतील ग्रंथालय विभागाचे प्रमुख ग्रंथपाल श्री .एम .डी .पवार सर यांनी इयत्तावार पुस्तकांची रचना करून प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तक सुलभरितीने वितरित कसे करता येईल याचे व्यवस्थापन करून ठेवले होते. त्यानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्य पुस्तकांचे वितरण समारंभ पुर्वक शिक्षक व पालकांच्या हस्ते करण्यात आले .आणि विद्यार्थ्याचे अभ्यासाचे चैतन्य फुलविण्यास मदत करण्यात आली.