*कोंकण Express*
*कनेडी प्रशालेत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ “प्रवेशोत्सव” उत्साहात साजरा.*
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार-शुक्रवार, दिनांक- १५ जून २०२४ रोजी कनेडी प्रशालेत नवगत विद्यार्थी स्वागत कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
*कनेडी प्रशाला ही ग्रामीण भागातील नावलौकिक व आदर्श प्रशाला असून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे,शैक्षणिक वर्ष २०२०-२५ या वर्षांमध्ये बालमंदिर ते बारावी पर्यंत अनेक नवीन विद्यार्थ्यांनी प्रशालेत प्रवेश घेतला असून सालाबाद प्रमाणे १५ जून हा शाळेचा पहिल्या दिवशी आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रशालेत नवगत विद्यार्थ्यांचे व पालक यांचा स्वागत कार्यक्रम सरस्वती मंदिर परिसरात साजरा करण्यात आला*
*प्रशालेत नवीन प्रविष्ट झालेल्या प्रत्येक वर्गातील नवगत विद्यार्थी व पालक यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, तसेच पुढील भावी वाटचालीसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा. सुमंत दळवी,पर्यवेक्षक मा. बयाजी बुराण यांनी शुभेच्छा दिल्या*
*या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते*
*सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन व आभार मा.श्री. प्रसाद मसुरकर (सहा. शिक्षक माध्यमिक) यांनी केले*