*कोंकण Express*
*जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकरीता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारतीत जागा मिळावी….*
*भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले निवेदन*
दि महाराष्ट्र को-ऑप. मार्केटींग फेडरेशन लि. मुंबई ९ हि राज्यातील सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे. संस्थेचे कामकाज महाराष्ट्र शासनाच्या प्राशसकीय नियंत्रणात चालते. सदर संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाात जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणत धान्य खरेदी केली जाते. तसेच शेतकऱ्यांच्या हितार्थ / निगडीत शासनाच्या या कार्यालयाशी संबंधित सर्व योजना राबविल्या जातात धान्य खरेदीचे कामकाज हे जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संबधीत असल्यामुळे कामकाजाच्या अनुषंगाने वारंवार जिल्हा पुरवठा शाखा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे ये जा करावी लागते त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे सध्या आमचे कार्यालय ओरोस येथे खाजगी इमारतीत भाडे तत्वावर आहे. यासाठीच जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकरीता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारतीत जागा मिळावी म्हणून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी.