वक्त आने दो जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे…. शिवसेनेचा तो बॅनर लक्षवेधी

वक्त आने दो जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे…. शिवसेनेचा तो बॅनर लक्षवेधी

*कोंकण Express*

*वक्त आने दो जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे…. शिवसेनेचा तो बॅनर लक्षवेधी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

येथील शिवसेना कार्यालयास बाहेरील निवडणूक धामधुमी नंतरचा अभिनंदनचा बॅनर बदलला असून या ठिकाणी सर्वांनाच लक्षवेधी ठरणारा जरा हटके आणि भविष्यात वादग्रस्त ठरेल असा हा बॅनर शिवसेना कार्यालयाबाहेर लावण्यात आला आहे. आज झालेल्या एका बैठकीनंतर अवघ्या काही मिनिटात हा बॅनर लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

वक्त आने दो जवाब भी देंगे औरंगे असा चॅलेंजिंग सामंत बंधूचा बॅनर कणकवलीत कार्यालयाबाहेर झळकतोय, आज कणकवली संपर्क कार्यालय येथे शिवसेना पदाधिकारी बैठक घेण्यात आली होती. या ठिकाणी या ठिकाणी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान असलेले आपले अनुभव यावर तक्रार वजा विचारमंथन करण्यात आले आणि बैठक संपताच या ठिकाणी हा चॅलेंजिंग बॅनर झळकविण्यात आला.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराच्या मुद्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी आरोप केले होते. त्यानंतर त्याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरणही केले होते. तर आमदार नितेश राणे यांनी काही जणांचा हिशोब चुकता करायचा आहे असा इशारा देखील कणकवलीतील पत्रकार परिषदेत दिला होता. दरम्यान नूतन खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदनचा शिवसेना नेते किरण सामंत व जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी शिवाजी महाराज चौकात लावलेलाल बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आला होता. त्यामुळे याबाबतही उलट सुलट चर्चा सुरु असतानाच कणकवलीत शिवसेना कार्यालया बाहेर लावलेला हा बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!