*कोंकण Express*
*डॉ. सतीश कामत साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटचे प्राध्यापक तथा प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांना २०२४ च्या साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एस फोर सेल्युशन या भारतीय अग्रगण्य प्रकाशन संस्थेने डॉ. सतीश कामत यांच्या प्रकाशित साहित्याची दखल घेतली आणि हा पुरस्कार त्यांना जाहीर केला.
डॉ. सतीश कामत मागील २२ वर्षे कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे अध्यापन करीत असून आपल्या या सेवेच्या काळात अध्यापनाबरोबर संशोधनपर समीक्षात्मक आणि ललित साहित्य प्रकारात विपुल लेखन केले आहे. त्याचबरोबर वर्तमानपत्र नियतकालिकांतूनही विपुल लेखन केले आहे. त्यांनी आतापर्यंत महत्त्वपूर्ण अशा दहा ग्रंथांचे संपादन केले असून स्वतंत्र विषयावरची चार पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. नुकताच त्यांचा प्रकाशित झालेला ‘भवतालची माणसं’ हा व्यक्तिचित्रण संग्रह वाचकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
यापूर्वी डॉ. सतीश कामत यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कोकण मराठी साहित्य परिषद व दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यासह अनेक नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. सतीश कामत यांच्या या यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, संचालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.