*कोंकण Express*
*पेंढरीचे शिक्षक रुपेश बांदेकर यांना ‘लोकराजा राजश्री शाहू गौरव पुरस्कार’ जाहीर*
*कासार्डे प्रतिनीधी : संजय भोसले.*
आविष्कार भारत फाउंडेशन च्या वतीने लोकराजा राजश्री शाहू गौरव-२०२४ राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्काराने शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल देवगडमधील पेंढरी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक रुपेश गंगाराम बांदेकर यांना जाहीर झाला आहे.
रूपेश बांदेकर यांच्या या गौरवास्पद यशाबद्दल सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे..शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या तसेच कला,कौशल्य, क्रीडा क्षेत्रातून भरीव योगदानाबद्दल यावर्षीचा हा मानाचा पुरस्कार राज्यस्तरीय त्यांना जाहीर झाला आहे.पुरस्काराचे श्रेय आपल्या आई,वडिलांना तसेच आपल्या गुरू जनांना रूपेश बांदेकर यांनी दिले आहे.
रुपेश बांदेकर यांचे मूळ शिक्षण सावंतवाडी तालुक्याच्या इन्सुली गावात झाले.आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत तसेच संपूर्ण गावातली ज्येष्ठ मार्गदर्शकांचा तसेच शिक्षकांचा ही मोठा वाटा असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.
या पुरस्काराचे वितरण रविवार दि.30 जून 2024 रोजी सकाळी १०.३० वा. कोल्हापूर येथील दसरा चौकातील राजश्री शाहू स्मारक मुख्य सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत.

