*कोंकण Express*
*कणकवली कॉलेज कणकवली मध्ये पर्यटन व आदरातिथ्य व्यवस्थापन Tourism and Hospitality Management या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी इयत्ता अकरावी वर्गामध्ये मोफत प्रवेश*
*पार्ट टाइम जॉब करत शिकण्याची सुवर्णसंधी*
कणकवली कॉलेज कणकवली मध्ये पर्यटन व आदरातिथ्य व्यवस्थापन Tourism and Hospitality Management या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी इयत्ता अकरावीचा प्रवेश सुरू झाला आहे, Hotel Management ,Tourism Management,Catering Management,Event Management,Transport Management, Food Service Management,Travel Agency Management यासारख्या उपयुक्त विषयांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास यामध्ये समाविष्ट आहे बारावीनंतर या विषयांमध्ये विशेषीकरण करून पदविका किंवा पदवी घेतल्यास नोकरीची हमखास संधी उपलब्ध होत असते पदवी व पदवीका शिक्षणाच्या सोयी आपल्या जिल्ह्यामध्ये आता अनेक ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत, सदर कोर्स पूर्ण करून नोकरी तसेच स्वयंरोजगार मिळवण्यासाठी अर्धवेळ नोकरी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना देखील अकरावी मध्ये प्रवेश घेता येईल तरी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कणकवली कॉलेजशी संपर्क साधावा हा अभ्यासक्रम शासनमान्य व पूर्ण अनुदानित स्वरूपाचा असल्याने अकरावीचा प्रवेश मोफत असणार आहे भारतातील ,महाराष्ट्र राज्यामध्ये सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या अनेक अनेक संधी उपलब्ध होणार आहेत पण येथील मुलांनी योग्य शिक्षण घेऊन या संधीचा फायदा करून घेणे आवश्यक आहे दहावी मधील गुणांची टक्केवारी बारावी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी देखील हा कोर्स उपयुक्त आहे. संपर्क फोन : कोरगावकर सर 8180889753 भिसे सर 8432547667

