व्यसनमुक्तीच्या सिंधुदुर्ग ब्रँड ॲम्बेसेडर पदी अभिनेत्री अक्षता कांबळी

व्यसनमुक्तीच्या सिंधुदुर्ग ब्रँड ॲम्बेसेडर पदी अभिनेत्री अक्षता कांबळी

*कोंकण Express*

*व्यसनमुक्तीच्या सिंधुदुर्ग ब्रँड ॲम्बेसेडर पदी अभिनेत्री अक्षता कांबळी*

*नशाबंदी मंडळाची तीन दिवसीय वार्षिक नियोजन बैठक गोपुरीत संपन्न*

*मत परिवर्तनातून व्यसनमुक्ती साठी नशाबंदी मंडळाचा अविरत प्रयत्न*

शनिवार ८जून २०२४ रोजी संघटक संवाद, समन्वयक व नियोजन बैठकीचा समारोप गोपुरी येथे करण्यात आला यावेळी सिंधुदूर्ग च्या सुप्रसिद्ध अष्टपैलू सिनेकलाकर अक्षता कांबळी,जिल्हा अभियंता सिंधुदूर्ग मा.अजय सर्वगौडा, सार्वजनिक बांधकाम विभाग मा.विनायक जोशी,लोकमत संपादक मा.महेश सरनाईक,नशाबंदी मंडळ चे रुपेश गी रा, जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, प्रा.राजेंद्र मुंबरकर,नशाबंदी मंडळ च्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुख्य संधटक- चिटणीस श्री अमोल स. भा. मडामे, कार्यकरिनी सदस्य बॉस्को डिसोजा, यांच्या उस्थित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र तील ३६ जिल्ह्यातील संघटक,जिल्हा प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य गेल्या ६५ वर्षापासून कार्यरत असून मंडळाची वार्षिक नियोजन बैठक ६,७,८ जून तीन दिवस कोकण चे गांधी म्हणून परिचित असलेले आप्पासाहेब पटवर्धन यांच्या कर्मभूमीत गोपूरी आश्रम येथे पार पडली . गोपूरी चे अध्यक्ष प्रा.राजेंद्र मुंबरकर, अर्पिता मुंबरकर,कार्यकारणी सदस्य यांनी नियोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!