नारायण राणेंच्या विजयात महिला मोर्चाचे मोठे योगदान…

नारायण राणेंच्या विजयात महिला मोर्चाचे मोठे योगदान…

*कोंकण Express*

*नारायण राणेंच्या विजयात महिला मोर्चाचे मोठे योगदान…*

*बांदा ः प्रतिनिधी*

भाजपचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला मतदारांचे योगदान मोठे आहे, असा दावा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर यांनी केला आहे. दरम्यान आगामी काळात महिलांचे रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी नारायण राणे व भाजपच्या अन्य नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. राणेंच्या विजयानंतर त्यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

त्यात असे म्हटले आहे कि, महिला मोर्चाच्या प्रमुख चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चाचे जिल्हा संघटनात्मक काम सुरू आहे. सौ. नीलम राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन आगामी काळात महिलांना रोजगार, तरुणींच्या नोकरी संदर्भातल्या समस्या, शेतकरी बांधवांचे प्रश्न, खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न आमचे राहतील. या प्रचारादरम्यान नारायण राणे, रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, सर्व मंडल अध्यक्ष, महिला मंडल अध्यक्ष, वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाने काम केले. तसेच महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांची मोलाची साथ लाभली. यापुढे देखील महिला मोर्चाने असेच संघटितपणे काम करून पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करावेत असे आवाहन सौ. कोरगावकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!