*कोंकण Express*
*सावंतवाडी भाजपच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी भाजपच्या वतीने तालुका कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मनोज नाईक, आनंद नेवगी, रवी मडगावकर, विनोद सावंत, गुरु मठकर, सचिन साटेलकर, प्रवीण पंडित आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.