*कोंकण Express*
*जागतिक पर्यावरण दिना निमित्त तळेरे नं.1मध्ये औषधी व मसाला वनस्पतीचे वृक्षारोपण*
*निसर्ग मित्र व पत्रकार मित्रपरिवार आणि प्रज्ञांगणचा स्तूत्य उपक्रम*
*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले.*
निसर्ग मित्र परिवार तळेरे , पत्रकार मित्र परिवार तळेरे व प्रज्ञांगण यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून रोजी जि.प.आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.1च्या परिसरात औषधी वनस्पती व मसाल्याचे पदार्थाच्या वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या शाळेच्या विद्यार्थ्यिंनी कु.प्रेक्षा दिपक नांदलस्कर व कु.रिध्दी राजेश जाधव यांच्या शुभहस्ते सदरचा वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला.यामध्ये काही औषधी वनस्पती तर तमालपत्र,लवंग, दालचिनी जायफळ,ओवा,कडीपत्ता या मसाल्याच्या वनस्पती बरोबरच जांभुळ,शेवगा या वनस्पतीची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी स्व.सुनील चॅरिटेबल ट्रस्टचे-अध्यक्ष सुरेश तळेकर,निसर्ग मित्र परिवाराचे माजी अध्यक्ष दादासाहेब महाडिक,तळेरे गावचे उपसरपंच शैलैश सुर्वे,माजी उपसरपंच दिपक नांदलस्कर,निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, उपाध्यक्ष दत्तात्रय मारकड, सचिव राजेश जाधव,माजी सरपंच शशांक तळेकर,तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुदवडकर,प्रज्ञांगणचे संस्थापक सतिश मदभावे,
मयुर चव्हाण यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
*निकेत पावसकर यांच्याकडून 50 झाडांची भेट..*
पत्रकार व राष्ट्रीय किर्तीचे हस्तलिखित पत्र संग्राहक निकेत पावसकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून तळेरेतील निसर्ग मित्र परिवाराला 50 झाडांची भेट दिली. त्यापैकीच आज तळेरे नं.1 शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 मसाल्याची व औषधी वनस्पतीची झाडे लावून शुभारंभ करण्यात आला.
*शालेय पोषण आहारासाठी उपयुक्त आणि बचत व्हावी म्हणून…*
शालेय परिसरात मसाल्याच्या आणि औषधी वनस्पतीच्या वृक्षारोपण बाबत माहिती देताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जाधव म्हणाले की, शालेय पोषण आहारात लागणारे विविध मसाल्याचे पदार्थ उपलब्ध व्हावेत तसेच औषधी वनस्पतींची विद्यार्थ्यांना तोंड ओळख होईल हा मुख्य हेतु आहे.
*आमची जमीन आमचे भविष्य यावर्षीची थीम…*
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रतीवर्षी एक थीम देण्यात येते यावर्षी ‘आमची जमीन आमचे भविष्य!’जमीन पुर्नरसंचित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळाच्या प्रतिरोधकताबाबत उपाययोजना अशी थीम आहे.
*1974 ला पहिला पर्यावरण दिन*
जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी जगभर अनेक देशात साजरा केला जातो.सन1974 साली,युएस एक मध्ये पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला. आजचा हा 51वा जागतिक पर्यावरण जगभर आणि भारतभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला गेला.सागरी प्रदूषण,जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत विकास आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. ज्यामध्ये दरवर्षी 143 हून अधिक देशांचा सक्रिय सहभाग असतो.
याप्रसंगी तळेरे पंचक्रोशीतील विविध शाळेत ‘ग्रीन स्कूलची संकल्पना’ सत्यात आणण्यासाठी तळेरे निसर्गमित्र परिवार व तळेरेतील इतर स्वंयसेवी संस्थांच्या सहकार्याने लवकरच एक उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती सतिश मदभावे,संजय खानविलकर,दत्तात्रय मारकड यांनी याप्रसंगी दिली.