*कोंकण Express*
*माहितीचे विजयी उमेदवार नारायण राणे यांची कणकवलीत भव्य दिव्य रॅली काढून होणार स्वागत*
*श्रीधर नाईक चौक ते बाजारपेठ मार्गे निघणार विजयी रॅली समीर नलावडे*
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून मोठ्या मोठ्या संख्येने विजय झाल्यानंतर राणेंची विजयी रॅली आज कणकवली शहरातून काढली जाणार आहे. कणकवली शहरात संध्याकाळी 6.30 वाजता श्रीधर लाईट चौक ते पटवर्धन चौक मार्गे बाजारपेठ ते पटकीदेवी मंदिरा पर्यंत ही रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भव्य स्वागत केले जाणार असल्याचेही नलावडे यांनी सांगितले. भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.