*कोंकण Express*
*मा.केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांचा विजय कोकण विकासाला नवंसंजीवनी देणारा :-श्री विष्णू मोंडकर भाजपा जिल्हा प्रवक्ते सिंधुदुर्ग*
कोकण विकासाठी गेले 30 वर्षापेक्षा कार्य करणारे मा.केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या वर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाचा हा विजय असून या विजयामुळे कोकण विकासाला नवसंजीवनी मिळेल यात शंका नाही.सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्रजी चव्हाण यांची भूमिका या विजयात किंगमेकर राहिली असून सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांचे नियोजन तसेच श्री अतुलजी काळसेकर ,श्री निलेशजी राणे श्री नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या विजयात शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस ,मनसेना सर्व युतीच्या कार्यकार्त्यानी नेत्यांनी प्रामाणिक पणे केलेल्या मेहनतीचा हा विजय असून माजी खासदार श्री विनायक राऊत आणि आमदार श्री वैभव नाईक यांना आत्मचिंतनाचा आहे प्रत्येक वेळी दहशतीचा मुद्दा समोर करून प्रत्येक वेळी जनतेला दिशाहीन केले जात नाही हे मतदार संघाच्या जनतेने दाखवून दिले आहे या पुढे कोकणच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक रोजगार विकासाचे पर्व सुरु होण्याचा मार्ग तयार झाल्याचे मत श्री विष्णू मोंडकर प्रवक्ते भाजपा सिंधुदुर्ग यांनी व्यक्त केले आहे .