सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिक्षक यांचा सन्मान

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिक्षक यांचा सन्मान

*कोंकण Express*

*सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिक्षक यांचा सन्मान*

*ज्यांनी आम्हाला प्राथमिक शिक्षण देऊन घडविले त्यांचा सन्मान करणे, हे आमचे कर्तव्यच – राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे प्रतिपादन*

दिनांक ०२/६/२०२४ कणकवली, माऊली मित्र मंडळाचे वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते उत्तम आनंदा सुर्यवंशी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,

*यावेळी माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य अविनाश गावडे, सुभाष उबाळे उपस्थित होते,

*सुर्यवंशी गुरूजी यांच्या पत्नी, आई, सौ वैशाली सामंत सुर्यवंशी उपस्थित होत्या,

*यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सुर्यवंशी गुरूजी बद्दल गौरवोद्गार व्यक्त करताना असे म्हटले की, १९८९ साली प्राथमिक शिक्षण देऊन असंख्य विद्यार्थी घडविले, २००८ साली गुरूजींनी मुख्याध्यापक म्हणून , तसेच २००९ साली केंद्रप्रमुख म्हणून आदर्शवत शिक्षणाची सेवा गेली ३५ वर्षे विद्यार्थी घडविण्यासाठी आपले आयुष्य वेचले,

*अशा या थोर व्यक्तिमत्वाला सन्मानित करताना आम्हाला विषेश आनंद होत आहे, असेही पेडणेकर म्हणाले,

*माऊली मित्र मंडळाचे उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांनी सुर्यवंशी गुरूजींना भावी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!