*कोंकण Express*
*दहावीत ९६ टक्के गुण मिळवून वेंगुर्ले तालुक्यात चौथी आलेली विद्यार्थीनी कु. स्नेहा राजन नार्वेकर हिचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार*
वेंगुर्ले शहरातील असलेली स्नेहा राजन नार्वेकर या ९६ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थिनीची रायफल व पिस्तूल नेमबाजी स्पर्धेतही राष्ट्रीय स्तरावर तिची निवड झाली आहे. तिसरीपासूनच स्नेहाला साहसी खेळांची आवड होती. समुद्रातील जलतरण स्पर्धेतही तिने सहभाग घेऊन यापूर्वी राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली होती.
स्नेहा गोवा म्हापसा येथील यश अॅकॅडमीमधून रायफल व पिस्तूल नेमबाजी स्पर्धेचे प्रशिक्षण घेत आहे. हे सगळे प्रशिक्षण घेत असतानाच नेमबाजीच्या राष्ट्रीय स्पर्धेत तिची निवड झाली होती. याचवेळी स्नेहाने मिळवलेले दहावीतील हे यश कौतुकास्पद ठरले आहे. शाळा, दहावीचा अभ्यास व नेमबाजीचे प्रशिक्षण हे सगळे सांभाळूनच तिने हे यश मिळवले आहे. पश्चिम विभागीय नेमबाजी स्पर्धेत यश मिळविल्याने तिची राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यापूर्वी गोवा राज्यात झालेल्या नेमबाजी स्पर्धेत दोन वेळा सुवर्ण पदक मिळवले आहे.
*वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलची विद्यार्थिनी असलेली स्नेहा अभ्यासातही पहिलीपासून हुशार आहे. अभ्यास सांभाळून त्यांनी आपल्या साहसी खेळाचे स्पर्धेचा सरावही चालू ठेवला होता. जलतरणाची आवड असल्याने समुद्रातील सहासी स्विमिंग स्पर्धांमध्येही तिने यश मिळवले आहे. या स्पर्धेतही तिची राष्ट्रीय स्तरावर नोंद घेण्यात आली आहे. त्यानंतर आलेल्या करोना कालावधीने जलतरणमधील प्रशिक्षणात अडथळा ठरल्याने ते मागे पडले. पण जिद्दी व साहसी असलेल्या स्नेहाने रायफल व पिस्तूल नेमबाजीच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. नववीत असतानाच तिने प्रशिक्षण सुरू केले होते. स्नेहाची आई गृहिणी आहे तर वडील शेतकरी बागायतदार आहेत. जेईई या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सुरू केली आहे. त्यानंतर नॅशनल डिफेन्स या विषयांमध्ये प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून या विषयातच पुढे करिअर करून आर्मीमध्ये जाण्याची इच्छा स्नेहा नार्वेकर हीने बोलताना व्यक्त केली.*
या सत्कार प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बावली वायंगणकर , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर , ओबीसी सेल चे प्रमोद वेर्णेकर , वारकरी संप्रदायाचे किशोर रेवणकर इत्यादी उपस्थित होते .