*कोंकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयाच्या कला शाखेचा १००/ टक्के तर वाणिज्य शाखेचा ९७/ निकाल.*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटचा कला शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा ९७% निकाल लागला मार्च २०२४ मध्ये मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या तृतीय वर्षाच्या परीक्षेचा हा निकाल असून महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली. कला शाखेत मराठी, इंग्रजी, हिंदी, भूगोल, इतिहास व अर्थशास्त्र हे विषय शिकवले जातात. त्या सर्वच विषयांचा निकाल शंभर टक्के लागला असून कला शाखेतून कु.सिद्धी संतोष बागवे ७६.३३ टक्के( हिंदी/भूगोल) प्रथम क्रमांक. कु साक्षी श्रीकृष्ण मसुरकर ७४.३३% (इतिहास/अर्थशास्त्र) द्वितीय क्रमांक तर तन्मय वसंत दळवी (हिंदी/ भूगोल) ७२.६६% तृतीय क्रमांक असे यश संपादन केले.
महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल ९७ % लागला असून त्यात हमीदा अहमद काझी प्रथम क्रमांक ६८.८३/ कु. पूनम भास्कर कानडे६७.३३/ द्वितीय क्रमांक तर कू.श्रद्धा राजेंद्र गुरव तृतीय क्रमांक६१.६७/ असे क्रमांक पटकावले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. सुभाष सावंत, सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर लींग्रस, खजिनदार श्री.आनंद मर्ये तसेच सर्व संचालक, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.