नांदगाव ग्रा.पं.वर घागर मोर्चा; “कोणी पाणी देत का हो पाणी” घोषणांनी परिसर दणाणला

नांदगाव ग्रा.पं.वर घागर मोर्चा; “कोणी पाणी देत का हो पाणी” घोषणांनी परिसर दणाणला

*कोकण Express*

*नांदगाव ग्रा.पं.वर घागर मोर्चा; “कोणी पाणी देत का हो पाणी” घोषणांनी परिसर दणाणला!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नांदगाव गावातील आठ वाडयांची असलेली ग्रा.पं.च्या जलस्वराज्य नळपाणी योजनेत अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने, तेथील नळग्राहकांनी आज ग्रा.पं.वर घागर मोर्चा काढला होता. यात बहुसंख्यसेने ग्राहक सहभागी झाले होते. “कोणी पाणी देत का पाणी”, “पाणी नाही नळाला ,ग्रा.पं.कशाला,” “पाणी सुरळीत करा, नाहीतर खुर्चा खाली करा”, हाय हाय, ग्रा.पं.हाय हाय, नांदगावातील नळ ग्राहकांचा विजय असो. आदी घोषणांनी नांदगाव परिसर दणानूण गेला होता. यात महीलांची उपस्थीती लक्षणीय होती. हांडे, घागरी वाजवत घोषणाबाजी करत शेकडो नळपाणी ग्राहकांचा मोर्चा ग्रा.पं.वर धडकला होता.

त्यानंतर दोन तास चर्चा झाल्यानंतर ग्रा.प.च्या मागणी नुसार १० दिवसाची मुदत देण्यात आली असून, जर या १० दिवसात पाणी सुरळीत न झाल्यास शुक्रवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा ग्रा.पं.घागर मोर्चा काढण्याचा इशारा लेखी स्वरूपात देण्यात आला आहे. याबाबत सरंपच व उपसरंपच यांनी मोर्चाला सामोरे जात केसीसी कंपनी मुळे आपली नळ पाईप लाईन ची कामे बाकी आहेत त्यांना सुचना देवून ही कार्यवाही होत नाही. तेव्हा तुमची आम्हाला साथ हवी आहे. तेव्हा त्यांना अंतिम नोटीस देण्यात यावी अशी सुचना देण्यात आली. असे सांगण्यात आले.

नांदगाव वाशिनवाडी, नांदगाव तिठा, खालचीमुस्लीमवाडी, सिसयेवाडी, बिडयेवाडी, मोरयेवाडी , पाटीलवाडी , पावाचीवाडी अशा वाड्यांसाठी नांदगाव ग्रा.पं.मार्फत नळपाणी योजना राबवित आहे. मात्र कित्येक दिवस अनियमीत पाणी पुरवठा होत असल्याने याबाबत सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. व सुरळीत न झाल्यास घागर मार्चा चा इशारा देण्यात आला होता.

आज सकाळी १० वाजल्यापासून नळ ग्राहक नांदगाव ओटव फाटयावारील बॉक्स ब्रीज खाली जमा होण्यास सुरूवात झाल्यानंतर ११ वा. घागर मोर्चाला सुरूवात झाली होती. नांदगाव ओटव फाटा ते नांदगाव ग्रा.पं. पर्यंत पायी चालत घागर मोर्चाला सुरूवात झाली. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यामुळे येत्या पाच दिवसात नळपाणी सुरळीत न केल्यास ग्रा.पं.वर घागर मोर्चा काढणार असल्याचा इशारा आज नळ ग्राहकांनी नांदगाव ग्रा.पं.ला दिला आहे.

यावेळी तोसिम नावलेकर बाळा सातोसे,दिपक मोरजकर,सो.सा.चेअरमन रविंद्र तेली,बाळा मोरये,बाळा बिडये, विटू बिडये, शमिर नावलेकर,हसन नाचरे,संतोष बिडये,कमलेश मोदी तसेच घागर मार्चा ला पांठीबा देण्यासाठी नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर, सुध्दा उपस्थीत होते. तसेच शेकडो महीला वर्ग नळपाणी ग्राहक मोर्चात सहभागी झाले होते.

तसेच ग्रा.पं.च्या वतीने चर्चेत नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, नांदगाव ग्रामविस्तार अधिकारी श्री हरमळकर भाई मोरजकर तसेच ग्रा.पं.सदस्य, केसीसी कंपनी तसेच जीवन प्राधिकरण अधिकारी ही उपस्थीत होते.

दरम्यान, बाकीच्या गावांनी सोमवारी सुध्दा पाणी येत आहे, आणि आपल्याकडे दरदिवशी पाणी देण्यास काय हरकत आहे ? पाण्याची टाकी भरण्यास कीती तास लागतो ? आजपर्यंत टायमर कीती खरेदी केले आहे व चालू स्थीतीत कीती आहेत. नविन भिडाच्या पाईप लाईनने पाणी सुरू केव्हा होणार आहे ? 2017 पासून नांदगाव च्या नळ पाणी योजनेवर कीती खर्च झाला ? नांदगाव ओटव फाटयावरी एकाच चरातून टाकलेली नळपाणी व विद्युत लाईन अलग करून तारे न टाकता जी चरातून लाईट केबल टाकण्यात आलेली आहे तेव्हा तीच केबल वरून घेवून सदर प्रश्न निकाली काढण्यात यावा.

प्रत्येक माणसाला नियमाने दरदिवशी पाणी मिळणे, शासनाच्या नियमाप्रमाणे अपेक्षीत असून देखीलही आपल्या बाबतीत असे का ? गेली दोन वर्ष पाण्याचा प्रश्न सुटत नाही लाखो रूपये खर्च करूनही पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकत नाही याबाबत लेखी उत्तर अपेक्षीत आहे. चर्चा झाल्यानंतर ग्रा.प.च्या मागणी नुसार १० दिवसाची मुदत देण्यात आली असून जर या १० दिवसात पाणी सुरळीत न झाल्यास शुक्रवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा ग्रा.पं.घागर मोर्चा काढण्याचा इशारा लेखी स्वरूपात देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!