*कोंकण Express*
*मुख्याध्यापक कुचेकर सर व श्री भोसले सरांचे भरीव योगदान शाळा कधीच विसरू शकत नाही* – प्रभाकर कुडतरकर*
*कासार्डे विद्यालयात मुख्याध्यापक कुचेकर सर व पर्यवेक्षक भोसले सर सेवानिवृत्ती सत्कार सोहळा*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
कासार्डे हायस्कूल मधील शिक्षक म्हणजे हिऱ्याच्या खाणीतील निवडलेले अस्सल हिरे असल्यानेच आमच्या शाळेची सर्वच क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू आहे.
सेवानिवृत्त होत असलेले सत्कारमुर्ती कुचेकर सर व भोसले सरांनी शाळेसाठी दिलेले योगदान कधीच विसरले जाऊ शकत नाही असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्थानिक व्यवस्था समितीचे माजी कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांनी कासार्डे विद्यालयात काढले.
कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.सी.कुचेकर व पर्यवेक्षक एस.डी.भोसले यांच्या सेवापुर्तीच्या निमित्ताने विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्यावतीने विद्यालयात आयोजित केलेल्या सत्कार समारंभ सोहळ्यात ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कासार्डे विकास मंडळ,मुंबई चे सहसचिव आनंद कासार्डेकर,स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,संस्था पदाधिकारी व विद्यालयचे माजी प्राचार्य एम.डी खाड्ये,सत्कारमूर्ती एन.सी.कुचेकर
,संजय भोसले,सौ.अनिता कुचेकर,सौ.आशाताई भोसले, प्र.मुख्याध्यापिका सौ. बी.बी. बिसुरे,वारगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके, कासार्डे सिनियर कॉलेजचे प्राचार्य मंदार नमसे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. बी.बी.बिसुरे यांनी करताना शिक्षक हा सामाजिक अभियंता असून शिक्षकांमुळेच अनेक संस्कारक्षम पिढ्या घडत असल्याचे असे गौरवोद्गार काढून श्री कुचेकर सर व श्री भोसले सर यांचे मार्गदर्शन आम्हाला दीपक स्तंभाप्रमाणे उपयोगी ठरणार असल्याची भावना याप्रसंगी व्यक्त केली.
*शिक्षक समाज घडवण्याचं काम करतात -आनंद कासार्डेकर*
याप्रसंगी संस्थेचे सहसचिव आनंद कासार्डेकर म्हणाले की, शिक्षक समाज घडवण्याचं काम करतो, कासार्डे विद्यालयाचा निरागस आणि निर्मळ मनाचा स्टाफ आहे, ही कौतुकाची बाब असून, कासार्डे शाळेचा आणि संस्थेचा नावलौकिक आमच्या गुणी शिक्षकांमुळेच वाढला असल्याचे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.
*अष्टपैलू शिक्षकांमुळेच शाळा प्रगतीपथावर- संजय पाताडे*
श्री भोसले सरांसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या गुणवंत शिक्षकांमुळे तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची विशेष हातोटी असलेल्या कुचेकर सरांसारख्या शिक्षकांमुळेच आमची शाळा प्रगतीपथावर असल्याची भावना स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
याशिवाय याप्रसंगी विद्यालयाचे माजी प्राचार्य एम.डी.खाड्ये,सीनियर कॉलेजचे प्राचार्य मंदार नमसे यांनीही मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
*शिक्षकांचे मनोगत-*
तर याप्रसंगी शिक्षकांच्यावतीने पी.जे. काळे,सौ रजनी कासार्डेकर, अवधूत घुले, दत्तात्रय मारकड,अनंत काणेकर, ऋचा सरवणकर,सुनिता कांबळे,अनिल जमदाडे,
विनायक पाताडे,
सौ.पेडणेकर,दिवाकर पवार, मंदार नमसे,देवेंद्र देवरुखकर,
यशवंत परब,सौ.डंबे,
अवधूत कानकेकर आदींनी या दोन्ही सत्कारमूर्तींच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकत त्यांच्या कार्याचा आढावा घेत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
*सोन्याची अंगठी देऊन सत्कार*-
कासार्डे माध्य.विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर सर व पर्यवेक्षक एस.डी भोसले सर यांचा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने कासार्डे माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रत्येकी शाल,श्रीफळ, सोन्याची अंगठी,पुष्पगुच्छ देऊन भव्य असा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
याशिवाय माजी विद्यार्थी, इतर मान्यवरांच्यावतीने सत्कारमूर्तींचे सत्कार झाले.
………………………………..
या सत्कार सोहळ्याला बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री.कांबळे,बीड जिल्ह्याचे माजी कृषी अधिकारी मोहन कुचेकर,तळेरेचे मंडल अधिकारी श्री.नागावकर,
श्री.आ. कृ. बोंबडे हायस्कूल,दाजीपूरचे मुख्याध्यापक.वाय.एम.सुतार दयानंद कांबळे(गोवा),
इंजिनियर संज्योत भोसले,आशिष भोसले व सुरज कुचेकर,गवाणे माध्यमिक विद्यालयाचे माजी कर्मचारी मारुती वळंजू, सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे श्री खोचरेकर सर,सागर कल्लढोणे तसेच कासार्डे विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.व्ही.राणे यांनी केले तर आभार अवधूत घुले यांनी मानून सत्कार सोहळ्याची सांगता केली.