*कोंकण Express*
*फोंडाघाट १ जून रोजी श्री देव राधाकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन ; विविध कार्यक्रमांचे आयोजन !*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
प्रतिवर्षाप्रमाणे, फोंडाघाट बाजारपेठेचे आराध्य श्री देव राधाकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन, शनिवार
तारीख १ जून २४ रोजी विविध उपक्रमांनी संपन्न होणार आहे. बालगोपाळ मंडळातर्फे सकाळी दहा वाजता अकरा “श्रीसत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी सकाळी नऊ वाजता लघुरुद्र, दुपारी बारा वाजता महाआरती- तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी सात वाजता हरिपाठ आणि रात्री नऊ नंतर स्थानिक भजनांचा कार्यक्रम होणार आहे. संपूर्ण मंदिर आणि साजऱ्या मूर्तीची आकर्षक रंग रंगोटी आणि विद्युत रोषणाईने कार्यक्रमाला ऊर्जा प्राप्त झाली आहे. तरी फोंडाघाट मधील तमाम भावीक महिला-पुरुष- बालगोपाळांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून, सहकार्य करावे, असे आवाहन मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.