कणकवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फ्रीस्टाईल हाणामारी !

कणकवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फ्रीस्टाईल हाणामारी !

*कोंकण Express*

*कणकवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फ्रीस्टाईल हाणामारी !*

*कणकवली ः प्रतिनिधी*

चित्रपटात शोभेल असा फिल्म स्टाईल राजा कणकवली येथील गजबजलेल्या आणि राजकीय दृष्ट्या चर्चेच्या बनलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घडला. हा राडा प्रत्यक्ष पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या एकाच राजकीय पक्षातील दोन गटांमध्ये घडलेल्या फ्रीस्टाइल हाणामारीने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामागे आर्थिक कारण असल्याचे समजते. एकाच पक्षातील कणकवली व कुडाळ तालुक्यामधील युवकांमध्ये झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीचा वाद कणकवलीत उफाळून आला. कणकवली राजकीय नाका बनलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कुडाळ मधील काही तरुणांचा एक गट व कणकवलीतील कलमठ गावडेवाडी मधील तरुणांच्या एका गटाची चर्चा सुरू असताना शाब्दिक बाचाबाची होत येथे जोरदार फ्रीस्टाइल राडा झाला. त्याच पक्षातील कुडाळ मधील एका नेत्याच्या निकटवर्तीय व कणकवलीतील त्याच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी यात मध्यस्थी करत या विषयावर पडदा टाकला. मात्र तोपर्यंत या हा फ्रीस्टाइल राडा पाहण्यासाठी शिवाजी महाराज चौकात अनेकांनी गर्दी केली होती.

या फ्री स्टाईल हाणामारीमागे आर्थिक कारण असल्याचे चर्चिले जात होते. कुडाळ तालुक्यातील धरणांवर ठेवण्यात येणाऱ्या सुरक्षारक्षकांचे कारण यामध्ये असल्याचे मानले जात आहे. सुरक्षारक्षकांची भरती करताना काही ठराविक रक्कम देण्याचे ठरले असल्याचे समजते. मात्र सदरची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. सुरक्षारक्षक नेमण्यासाठी अशा प्रकारची डील होत असेल तर यामागे अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत याबाबतची चर्चाही सुरू होते. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे दोन गट समोरासमोर भिडले. अचानकपणे सुरू झालेल्या या वादावादीने महामार्गावरून जाणाऱ्यांनी महामार्गावर थांबत हाणामारीचा आनंद लुटला. दोन्ही गट एकमेकांसमोर समोर आले असल्याने कोण कुणाला मिळत असल्याचे समजत नव्हते मात्र या दरम्यान एका राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी त्याचप्रमाणे दोन गावचे उपसरपंच या वादात सामील झाल्याने यामागे राजकीय चर्चा असावी असा अंदाज आला. त्यामुळे हे दोन्ही गट एकाच पक्षाचे असल्याचे निदर्शनास आले. कुडाळ तालुक्यातील एक जण कणकवली कलमठ गावडेवाडी मधील एकाचे एक लाख रुपये देणे होता. पैकी यातील काही रक्कम देऊन झाल्यावर उर्वरित रक्कम मिळत नसल्याने कलमठ मधील त्या तरुणाने तगादा लावला होता. हे सुरू असतानाच कणकवलीत येऊन दाखवा असे आव्हान त्यांना दिले होते असे समजते. दरम्यान त्यानंतर कुडाळ मधील ते तरुण एकत्र होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर शाब्दिक चकमक होत भर दुपारी फ्रीस्टाइल राडा झाला. मात्र एकाच पक्षांमधील सर्वजण यामध्ये असल्याने आपसात पाबाबत तडजोड करण्याकरता या चौकातून आवरते घेत घेत अन्य ठिकाणी जाऊन प्रकरण मिटवण्यात आले. मात्र याची चर्चा कणकवलीत जोरदार सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!