कळसुली-आंब्रड मार्गावरील मोरीला भगदाड

कळसुली-आंब्रड मार्गावरील मोरीला भगदाड

*कोकण Express*

*कळसुली-आंब्रड मार्गावरील मोरीला भगदाड..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

तालुक्यातील कळसुली-आंब्रड मुख्य मार्गावरील गडगेवाडी येथे मोरीवर एकाच ठिकाणी तीन भगदाड पडली आहेत. याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. याचा नाहक त्रास वाहनचालकांना व पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कळसुली-आंब्रड रस्त्याची दरवर्षी डागडुजी केली जाते. तरी रस्त्यावरील खड्डे कायम का असतात. असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे. या मार्गावरून कळसुली, घोडगे, जांभवडे, भरणी, कुपवडे, शिरवल, शिवडाव आदी गावांतील स्थानिक नोकरी-व्यवसायानिमित्त सिंधुदुर्गनगरीकडे येतात. या मार्गावर वाहनचालकांची मोठी वर्दळ असते. गडगेवाडीतील मोरीवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सदर मार्गात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान मोरीवरील खड्डे संबंधित विभागाने तात्काळ बुजविण्याची मागणी वाहनचालकांसह येथील स्थानिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!