सावंतवाडी : दि १९ : शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत सावंतवाडी तालुकास्तरीय १९ वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुकास्तरावरील सामने बुधवारी बांदा येथे झाले.या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण ४ संघानी सहभाग घेतला होता. यामध्ये पहिला सामना बांदा काँलेज विरुद्ध कळसुलकर इंग्लिश स्कुल, सावंतवाडी यांच्यामध्ये झाला. या सामन्यांत बांदा संघाने विजय मिळवला. यानंतर दुसरा सामना आंबोली सैनिक स्कुल विरुद्ध आर.पी.डी.सावंतवाडी यांच्यात रंगला आंबोली सैनिक स्कुलला धडक देत आर.पी.डी.च्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. यानंतर अंतिम सामना बांदा काँलेज विरुद्ध आरपीडी हायस्कुल,सावंतवाडी यांच्यात रंगला आणि एकतर्फी खेळ करत आरपीडी हायस्कुलच्या संघाने विजेतेपद मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. आरपीडीच्या संघाला विशेष मार्गदर्शन क्रीडा शिक्षक शैलेश नाईक व सागर सावंत यांचे लाभले.आरपीडी च्या संघातून प्रथमेश शेडगे,आशिष पित्रे,आप्पा हिरलेकर,शिवम वारंग,आदित्य साळगांवकर, सोहम हिरलेकर, रोहित सोलकर,सदानंद मयेकर,ओंकार पालकर,गजानन सावंत,संदेश सावंत आदी खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुक्रवारी मालवण येथे जाणार आहेत. तालुकास्तरावर विजयी झाल्याबद्दल आरपीडीच्या संघाचे सर्वत्र कौतूक होत आहे.