*कोंकण Express*
*कोकणातील मुलांना एमपीएससी, यूपीएससी परीक्षेच चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधणार —मंत्री दीपक केसरकर.*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
दहावी, बारावी नंतर एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी कोकणच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांच लक्ष वेधणार आहे.
गेली तेरा वर्षे सातत्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा अव्वल येत असेल तर त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे सांगितले…