*कोंकण Express*
*किनारपट्टीवर भूमिगत वीज वाहिन्यासाठी 900 कोटी रुपये – शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
जिल्ह्यातील किनारपट्टीवर 900 कोटी रुपये खर्च करून भूमिगत वीज वाहिन्या टाकल्या जाणार आहेत, असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले तर कणकवली व सावंतवाडी शहरांमध्ये भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी आचारसंहिता शिथिल झाल्यावर प्रस्ताव सादर केला जाईल असे केसरकर म्हणाले.
मंत्री दिपक केसरकर आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रुपेश पावसकर उपस्थित होते, अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे त्यांना भरपाई मिळेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यास सहकार्य करावे. आचारसंहितेनंतर कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला जाईल. असे केसरकर म्हणाले.
सावंतवाडी शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी मंजुरी मिळाली होती. त्यासाठी निधीही मंजूर झाला होता. मात्र नगराध्यक्ष असताना त्यांनी ते काम केले नाही तेच आता बोलत आहेत, असे बबन साळगावकर यांचे नाव टाळत त्यांनी सांगितले.