*कोकण Express*
*अभय राणे मित्र मंडळ आयोजित ए.आर.एम.चषकचा मानकरी BDM संघ,परबवाडी विजेता… !*
*उपविजेता भालचंद्र स्पोर्ट कणकवली ; अष्टपैलू खेळाडू प्रणय राणे,उत्कृष्ट चढाई प्रथमेश पेडणेकर तर उत्कृष्ट पकड सूरज परब ठरला… !*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अभय राणे मित्र मंडळ आयोजित ए.आर.एम.चषक कणकवली प्रिमियर लिग २०२१ कबड्डी स्पर्धेचा मानकरी ठरला तो BDM संघ,परबवाडी विजेत्या प्रथम संघास रोख रु.२० हराज व चषक,उपविजेता भालचंद्र स्पोर्ट,कणकवली यांनी पटकाविला.या संघास रोख रु. १५ हजार रु.व चषक व तृतीय रुपेश स्पोर्ट ,चतृर्थ अक्षय स्पोर्ट यांना रोख रक्कम व चषक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अभय राणे मित्र मंडळ आयोजित ए.आर.एम.चषक कणकवली प्रिमियर लिग २०२१ कबड्डीचा महासंग्राम टेंबवाडी येथील मैदानात खेळवण्यात आला या पारितोषिक वितरण समारंभावेळी व्यासपीठावर संस्थापक अभय राणे,सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत,जेष्ठ नागरिक संतोष राणे,सुनील सावंत,मंडळाचे अध्यक्ष ओंकार राणे,उपाध्यक्ष सर्वेश राणे,अमित मांडवकर,पंकज बागवे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण ७ संघमालकानी आपले संघ उतरवले होते.शनिवारी पहिल्या दिवशी १० सामने खेळवण्यात आले.या साखळी सामन्यात संघानी रोमहर्षक खेळ केला.तर रविवारी अंतिम दिवशी १६ सामने खेळवण्यात आले.या सेमी फायनल सामान्यात रुपेश स्पोर्ट,अक्षय स्पोर्ट,BDM स्पोर्ट व भालचंद्र स्पोर्ट यांनी आगेकूच केली.या संघापैकी BDM स्पोर्ट व भालचंद्र स्पोर्ट यांनी चांगली खेळी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.पहाटेच्या गुलाबी थंडीत अंतिम सामना रंगला. यामध्ये BDM स्पोर्टने नाणेफेक जिंकत मैदान स्वीकारत चढाई साठी भालचंद्र स्पोर्टला आमंत्रण दिले. दरम्यान मध्यतरीच्या वेळे अंती BDM स्पोर्टकडून प्रणय राणे यांनी उत्कृष्ट चढाई करत सामन्यात आपले वजन सिद्ध केले. या संघाकडे अधिक गुण असल्याने सामना एकतर्फी होतो असे वाटले.मात्र भालचंद्र स्पोर्टकडून प्रथमेश पेडणेकरने प्रत्येक चढाईत बोनस गुण आणत गुण फलक हलते ठेवले.मात्र शेवटच्या मिनिटांत BDM स्पोर्टने १ गुणांनी चषकावर आपले नाव कोरले. दोन्ही संघाकडून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत खऱ्या अर्थाने क्रीडारसिकांची मने जिंकली. पहाटे पर्यंत चाललेल्या स्पर्धेस मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.वैयक्तिक बक्षिसांची खैरात उपस्थितांकडून करण्यात आली. या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून BDM स्पोर्ट मधील प्रणय राणे याची निवड करण्यात आली. उत्कृष्ट पकड BDM स्पोर्टचा सूरज परब तर उत्कृष्ट चढाई म्हणून भालचंद्र स्पोर्टकच्या प्रथमेश पेडणेकर यांची निवड करत त्यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. या सामन्यासाठी पंच म्हणून रामप्रसाद राणे,वशिम शेख,राजू बंगे,अजय राऊळ,दीपक चव्हाण,वेदांत हरमलकर यांनी काम पाहिले.समालोचन बाळू वालावलकर तर स्पर्धा यशस्वीतेसाठी ललित राणे,सागर राणे,संदेश आर्डेकर,बंडू राणे,रुपेश साळुंखे,शिवशंकर पारगावकर,समीर सावंत,विशाल जाधव,हरकेश पाल,श्विलिंग पाटील,बाबू बागवे,रोहन चव्हाण,शुभम कलिंगण,यश पालव यांनी विशेष मेहनत घेतली.