सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि एफ.सी. सावंतवाडी फुटबॉल संघाची निवड चाचणी

सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि एफ.सी. सावंतवाडी फुटबॉल संघाची निवड चाचणी

*कोंकण Express*

*सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि एफ.सी. सावंतवाडी फुटबॉल संघाची निवड चाचणी*

*संदिप एकनाथ गावडे आणि सहकारी यांचा पुढाकार*

*सावंतवाडी  ः प्रतिनिधी*

संदिप एकनाथ गावडे आणि सहकारी यांच्या पुढाकारातून सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयात प्रथमच अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शहरातील जिमखाना मैदान येथे २१ मे ते ३० मे या दरम्यान दररोज दुपारी ०३:०० ते ०६:०० वाजता हे शिबिर घेतले जाणार आहे. तसेच फुटबॉल क्षेत्रातील नामांकित तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी १६ मे ते २० मे पर्यंत नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी 8928050568 आणि 9011234772 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर शिबीरादरम्यान एफ. सी. सावंतवाडी या फुटबॉल संघाची निवड चाचणीही होणार आहे. या संघामध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी आगामी एका वर्षासाठी क्रीडा स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. तसेच एफ.सी.सावंतवाडी हा संघ आगामी मान्सून चषक स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.संघाच्या प्रशिक्षणासाठी तज्ञ प्रशिक्षक देखील लाभणार आहेत. एफ.सी. सावंतवाडी संघ तसेच जिल्ह्यातील खेळाडू हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसावेत असा मानस संदीप एकनाथ गावडे यांचा आहे त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. चाचणीसाठी नोंदणी २४ मे ते २७ मे पर्यंत करणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी 8928050568 आणि 9011234772 या नंबर वर संपर्क साधावा.

संदीप एकनाथ गावडे आणि सहकारी यांनी फुटबॉल प्रेमीं व खेळाडूंसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!