*कोंकण Express*
*वेंगुर्ले आगाराचे चालु असलेले नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे ; प्रसन्ना उर्फ बाळु देसाई*
*भाजपा प्रणीत सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाने आगार प्रमुखांचे लक्ष वेधले* .
*एस्.टी. च्या बांधकाम अधिकार्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पहाणी करूनच कामाला सुरुवात करावी* —- सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाची मागणी .
*एस्.टी.चे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांचेकडे संघटनेच्या वतीने तक्रार दाखल*
आज दिनांक 14- 05- 2024 रोजी वेंगुर्ले आगार व्यवस्थापक श्री राहुल कुंभार साहेब यांची सेवा शक्ति संघर्ष कामगार संघ वेंगुर्ला आगार मार्फत आगारातील विविध प्रश्नानं संदर्भात भेट घेण्यात आली यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा सेवा शक्ति संघर्ष कामगार संघटनेचे आगार अध्यक्ष श्री प्रसन्ना ( बाळु) देसाई, वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष श्री सुहास गवंडळकर, सेवा शक्ति संघर्ष कामगार संघ विभागीय उपाध्यक्ष श्री भरत सिताराम चव्हाण, आगार सचिव श्री दाजी तळवनेकर, आगार उपाध्यक्ष श्री भावू सावळ, विभागीय सहसचिव श्री महादेव भगत, इतर कर्मचारी उपस्थीत होते, आगाराचे सध्यास्थितीतील चालु असलेले नूतनीकरणाचे काम हे चुकीच्या पद्धतीचे आणी निकृष्ट दर्जाचे असल्याचे आगार व्यवस्थापक यांच्या समोर मांडण्यात आले, तसेच केलेले काम कशा पद्धतीत चुकीचे व निकृष्ट झालेले आहे हे आगार प्रमुखांच्या निदर्शनास आणले . विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून श्री प्रसन्ना ( बाळू) देसाई साहेब यांनी तात्काळ लक्ष घालण्यात यावे अन्यथा काम बंद करण्यात येइल अशी भूमिका मांडण्यात आली . आगारातील एका महिला वाहकाला नियम बाह्य पद्धतीने L.F.I. पोस्ट वर बसविण्यात आले असून. वाहतूक नियंत्रक श्री धामोळे यांच्याविषयी कर्मचारी तक्रार करत असुन देखील प्रशासन आपले हितसंबंध जोपासत असल्याचे आढळून आले . या सर्व विषयावर संघटने मार्फत लेखी पत्र देत रा. प. महामंडळाच्या नियमानुसार योग्य ती दखल न घेतल्यास सेवा शक्ति संघर्ष कामगार संघा तर्फे आक्रमक पवित्रा घेण्यात येइल अशी तंबीच संघटनेचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रसन्ना (बाळु) देसाई साहेब यांनी दिली.