देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होतील – पहा कशी आहे नियमावली ?

देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होतील – पहा कशी आहे नियमावली ?

*कोकण Express*

*देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होतील – पहा कशी आहे नियमावली ?*

▪️ काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने चित्रपटगृहे ५० टक्केपेक्षा अधिक क्षमतेने चालू होतील असे सांगितले होते

▪️ दरम्यान आता माहिती व प्रसारण मंत्रालयाने , देशाभरातील सर्वच चित्रपटगृहे 1 फेब्रुवारीपासून 100 टक्के क्षमतेसह सुरू होतील असे स्पष्ट केले आहे

◾ *पहा कशी आहे नियमावली ?*

● चित्रपटगृहामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीतकमी 6 फूट अंतर राखणे बंधनकारक असेल

● चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोडाला मास्क बंधनकारक आहे , चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दोन्ही ठिकाणी सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.

● कोणी खोकत अथवा शिंकत असल्यास त्याच्याकडे लक्ष देणे, त्यासाठी वेगळ्या आसनाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे – तसेच इतरत्र कुठेही थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे.

● कोणी आजारी व्यक्ती सिनेमागृहात आल्यास तातडीनं राज्यशासनाच्या आरोग्य खात्याला त्याची माहिती देणं महत्वाचे आहे – असेहि यामध्ये सांगण्यात आले आहे

● *1 फेब्रुवारीपासून देशभरातील चित्रपटगृह*- 100 टक्के क्षमतेने सुरु होतील – हि माहिती प्रेक्षकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!