_ओरोस येथे निरंजन डावखरे यांची सोनार समाजाने घेतली सदिच्छा भेट_

_ओरोस येथे निरंजन डावखरे यांची सोनार समाजाने घेतली सदिच्छा भेट_

*कोंकण Express*

*_ओरोस येथे निरंजन डावखरे यांची सोनार समाजाने घेतली सदिच्छा भेट_*

*कोकण पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी डावखरे यांना सोनार समाजाचा जाहीर पाठींबा*

*सिंधुदुर्ग*

कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना सोमवारी ओरोस येथे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची सोनार समाजाच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी मुंबई डिस्ट्रिक हाऊसिंग फेडरेशनचे तज्ञ संचालक आणि दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख विशाल कडणे यांच्या सोबत गणेश तळगावकर, चिंतामणी कल्याणकर, संकेत महाडिक आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत व विविध पदाधिकारी उपस्थित होते.

त्यावेळी कोकणातील रोजगार, स्वयंरोजगार, पदवीधरांचे विविध प्रश्न इत्यादी विषयावर सखोल चर्चा झाली. सोनार समाजाचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये मोठे वर्चस्व असून समाजाचे युवाप्रमुख विशाल कडणे यांच्या नेतृत्वाखाली सोनार समाजातील 2500 हुन अधिक पदवीधर मतदारांनी 10 जुन रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे. आजच्या शिष्टमंडळ भेटी दरम्यान 10 जुन रोजी होणाऱ्या कोकण पदवीधर निवडणुकीसाठी सोनार समाजाने निरंजन डावखरे यांना पाठींबा जाहीर केला आणि निवडणुकीत निरंजन डावखरे यांना निवडून आणण्याचा निश्चय जाहीर केला. भेटी दरम्यान समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आ. डावखरे यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!