सिडको बद्दल गैरसमज पसरून ऊबाठाची विजयाची स्वप्ने जनता धुळीस मिळवणार

सिडको बद्दल गैरसमज पसरून ऊबाठाची विजयाची स्वप्ने जनता धुळीस मिळवणार

*कोंकण Express*

*सिडको बद्दल गैरसमज पसरून ऊबाठाची विजयाची स्वप्ने जनता धुळीस मिळवणार*

*विष्णू मोंडकर जिल्हा प्रवक्ते भाजप सिंधुदुर्ग*

उबाठाचे उमेदवार श्री विनायक राऊत आणि त्यांचे समर्थक सातत्याने लोकसभा निवडणुकी मध्ये महायुती च्या विरोधात अप्रचार करत असून सातत्याने जिल्हातील जनतेला भावनिक करून आपली राक्षसी महत्वकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत सिडको महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकार जिल्ह्यातील जागा परप्रातिंयाच्या घशात घालणार असे श्री विनायक राऊत आणि त्याचे दिशाहीन कार्यकर्ते गावागावात जाऊन सांगत आहेत वास्तविक स्थिती वेगळी असून अश्या प्रकारची कुठलेही प्रकारचे संपादन प्रक्रिया सुरु झाली नसून फक्त जनतेला दिशाहीन करण्याचे काम चालू आहे कालच झालेल्या कणकवली येथे सभेमध्ये मा.केंद्रीय मंत्री श्री.नारायणराव राणे साहेब यांनी सिडको प्राधिकरण कुठलीही जागा संपादन करणार नसल्याचे स्पस्ट केले आहे.तसेच आता पर्यत सिडको च्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एकही नागरिक विस्थापित झाला नाही आहे आपल्या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग नगरी ओरोस सिडको महामंडळ ने वसवण्यात मदत केली असून लवकरच त्या ठिकाणी ओरोस नगरपंचायत होईल सिडको महामंडळ ची जिल्ह्यची अधिसूचना नंतर बांधकाम परवानगीचे अधिकार सिडको महामंडळ च्या ताब्यात जाणार असा गैरसमज पसरविण्यात आला असून राज्य सरकारने क्रमांक :-टीपीएस -1224/12/प्र.क.2/24/नवी -12 दिनांक 12/3/24 रोजिच्या महाराष्ट्राचे राज्यपाल याचे आदेशानुसार व नावाने निदेश पत्र जारी करून जिल्ह्यातील बांधकाम परवानगी नगर रचना विभाग कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कडेच असल्याचे निर्देशित केले आहे त्यामुळे जनतेने प्रत्येक वेळी गैरसज पसरवणाऱ्या श्री विनायक राऊत यांना घरी बसवेल आणि कोकण चे भाग्यविधेते केंद्रीय मंत्री श्री. नारायणराणे साहेब यांना विजयी करून लोकसभेत पाठवेल असा विश्वास श्री बाबा मोंडकर प्रवक्ते भाजपा सिंधुदुर्ग यांनी व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!